शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

खोपोलीत भरलेले खड्डे गेले वाहून  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 06:07 IST

खोपोली नगरपालिका हद्दीतील सर्व रस्त्यांची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था झाली आहे. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी शहराच्या सर्वच भागांची अवस्था झाली आहे.

वावोशी : खोपोली नगरपालिका हद्दीतील सर्व रस्त्यांची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था झाली आहे. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी शहराच्या सर्वच भागांची अवस्था झाली आहे. शहराच्या सर्वच भागात पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या डांबरीकरणाची बिकटावस्था आहे. अंदाजे ६५ लाख रुपये खर्च करून डांबरीकरणाचे पॅचेस मारण्यात आले होते. तर काही भागात रस्त्याचे डांबरीकरणसाठी २ कोटी खर्च करण्यात आले. पण निकृष्ट डांबरीकरणामुळे सर्वच रस्त्यांवर महाकाय खड्डे पडले तर अनेक भागात खडी रस्त्यावर डोकावते आहे. यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत इतर विषयांवर आक्रमकता दाखविणाºया लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत आक्र मकता दाखविली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ठेकेदाराक डून काम निकृ ष्ट करण्यात आले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, मागील वर्षी लव्हेज गावात नव्यानेच डांबरीकरणाचे काम करण्यात आले पण त्या संपूर्ण रस्त्याचे डांबर वाहून गेले आहे.अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनांचे अपघात होत आहे. लव्हेज शाळेसमोर महाकाय खड्डा पडल्याने वाहनांचे अपघात होत आहेत तसेच अनेक विद्यार्थी या खड्ड्यात पडल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. अशा ठेकेदारांवर लोकप्रतिनिधींनी जागृत राहून कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे.गणेशोत्सवापूर्वी खोपोली शहरातील खड्डे बुजविण्यात येतील. सध्या खड्डे भरण्याचे काम सुरु आहे.- संजय शिंदे,मुख्याधिकारी, खोपोली