शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या मर्जीनुसार पोलिसांच्या ‘पोस्टिंग’? पोलिस वर्तुळात नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2023 11:27 IST

पोस्टिंग जर त्यांच्या इच्छेनुसार होणार असल्यास गुणवत्ता काय कामाची?, असा सवाल पोलिस अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

अलिबाग : लोकप्रतिनिधींच्या वाढत्या हस्तक्षेपाबाबत प्रशासनाकडून नाराजी व्यक्त होत  असताना आता जिल्ह्यातील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या (एलसीबी) प्रमुख पदासह महत्त्वाच्या नियुक्त्या आमदारांच्या मर्जीवर होण्याची चिन्हे आहेत. मोक्याच्या पोस्टिंगसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांपेक्षा सत्तारूढ पक्षाच्या आमदारांची मर्जी मिळविण्यासाठी इच्छुक अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ सुरू असून तीन आमदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला जात आहे. 

पोस्टिंग जर त्यांच्या इच्छेनुसार होणार असल्यास गुणवत्ता काय कामाची?, असा सवाल पोलिस अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.राज्याच्या पोलिस महासंचालकांकडून शुक्रवारी निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या ४४९ बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये रायगडमधून ५ जणांची अन्यत्र बदली झाली. तर ६ अधिकारी अन्य ठिकाणाहून जिल्ह्यात हजर झाले आहेत. जिल्ह्यातून बदली झालेल्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून ‘डिटेक्शन’पेक्षा ‘कलेक्शन’मुळे जास्त चर्चेत असलेल्या ‘एलसीबी’चा समावेश आहे. पूर्वीचे प्रमुख दयानंद गावडे यांची ‘एसीबी’मध्ये बदली झाल्याने  त्यांचा  वारसदार म्हणून  कोणाकडे  धुरा  सोपविली जाते, याकडे जिल्हा पोलिस वर्तुळासह विभागाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संपर्कात असलेल्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

 ‘एलसीबी’साठी  नवी मुंबईतून  बदलून  आलेले  शत्रुघ्न माळी, चंद्रपूरहून आलेले बाळासाहेब खाडे आणि खोपोलीचे निरीक्षक शिरीष पवार यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र सत्तारूढ पक्षाचे तीन आमदार  ज्याच्या  नावाचा आग्रह धरतील,  त्याचीच वर्णी लागली जाईल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या लोकप्रतिनिधींनी यशस्वी ‘चर्चा’ करण्यासाठी इच्छुकांचे प्रयत्न सुरू आहेत.  महत्त्वाच्या  पोलिस ठाण्याच्या प्रभारी पद व अन्य नियुक्तीसाठी त्यांच्या  शब्दाला वजन असल्याने इच्छुकांकडून त्यांची मर्जी राखण्यावर भर दिला जात आहे. 

...तर गुणवत्ता काय कामाची?तमाच्या गुणवत्तेपेक्षा अन्य निकषाला अधिक महत्त्व दिले जात असल्यास  कोणाच्याही दबावाखाली कायदा व सुव्यवस्थेचे काम कसे सुरळीतपणे केले जाईल, असा सवाल पोलिस अधिकाऱ्यांतून व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Raigadरायगड