शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी भातशेती करपण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 03:50 IST

गेल्या १० दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यातील भात शेती धोक्यात आली आहे. शेतात पाणी नसल्याने जमिनींना भेगा पडल्या आहेत. पावसाच्या सरी मध्येच बरसत असल्या तरी शेतीसाठी त्या पूरक नाहीत.

अलिबाग : गेल्या १० दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यातील भात शेती धोक्यात आली आहे. शेतात पाणी नसल्याने जमिनींना भेगा पडल्या आहेत. पावसाच्या सरी मध्येच बरसत असल्या तरी शेतीसाठी त्या पूरक नाहीत. अशीच परिस्थिती राहिल्यास भात पीक करपून आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागणार असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. परंतु सध्याचा पाऊस हा समाधानकारक असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.जिल्ह्यामध्ये जून महिन्यामध्येच पावसाने जोरदार बरसून आपले मनसुबे स्पष्ट केले होते. हवामान विभागानेही वेळोवेळी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पाऊस समाधानकारक पडत होता. अख्खा जून महिना तसेच जुलै महिन्यामध्ये पावसाने चांगलाच जोर धरला. त्यामुळे शेतीच्या कामांनीही जोर पकडला होता. जिल्ह्यामध्ये भाताचे प्रमुख पीक घेतले जाते. त्यानुसार सर्वत्र मोठ्या संख्येने भाताची लावणी पूर्ण झाली आहे.भाताच्या पिकाने तग धरायला सुरुवात केली असतानाच आता पावसाने पाठ फिरवली आहे. गेले १० दिवस पाऊस लहरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच अधे-मधे कडक उन्हाच्या झळा बसत असल्याने अलिबाग तालुक्यातील काही ठिकाणच्या शेतातील जमिनीलाभेगा पडण्यास सुरुवात झालीआहे.भात पिकाला पुरेसे पाणी उपलब्ध झाले नाही तर भाताचे पीक करपण्याची शक्यता असल्याचे खंडाळे येथील शेतकरी नंदू सोडवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. पावसाची उघडीप कायम राहिल्यास ते शेतीला नक्कीच परवडणारे नसल्याने शेतकऱ्यांना फार मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी भातासोबतच बांधावर शेती करताना विविध भाजीपाला, मिरची, टोमॅटो यांचेही पीक घेतात. या पिकांनाही पाण्याची आवश्यकता असल्याने छोटे उत्पन्नही संकटात सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.स्थानिक बाजारात रोजचीरोज ताजी भाजी उपलब्ध होत असते, परंतु पावसाची नाराजी अशीच राहिल्यास स्थानिक बाजारांमध्ये स्थानिक पातळीवरचा भाजीपाला मिळणे कठीण होणार आहे. छोट्या प्रमाणात अशी भाजी विकणारेही आर्थिक संकटात सापडणार असल्याचे बोलले जाते.पावसाच्या आकेडवारीवर नजर टाकल्यास जून महिन्यात ९११.२५ मिमी सरासरी (१४१.६७ टक्के) पाऊस पडला होता. जुलै महिन्यातील पावसाच्या कामगिरीकडे पाहिल्यास १३२८.३४ मिमी सरासरी (११४.५८ टक्के) पाऊस झाला आहे, तर आॅगस्ट महिन्यात फक्त ३६.०७ मिमी सरासरी (०४.०८ टक्के) पाऊस झाला आहे. अजून पावसाचा हंगाम शिल्लक असला तरी, भात पिकाला वेळेवर मुबलक पाणी मिळाले नाही तर पीक संकटात येऊ शकते. त्यामुळे पावसाने बरसून बळीराजापुढील संकट दूर करावे अशी आर्त विनवणी करण्यात येत आहे.रायगड जिल्ह्यात पाऊस कमी झाला आहे, परंतु तो अधूनमधून बरसत असल्याने शेतामध्ये सध्या पुरेसे पाणी आहे. त्यामुळे शेतकºयांनी चिंता करण्याचे कारण नाही.-पांडुरंग शेळके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Raigadरायगड