शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेब गव्हाणकर यांची माथेरानमध्ये होणार ज्ञानज्योत, नगरपालिकेची सकारात्मक भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 03:01 IST

माथेरानमध्ये शिक्षणाची गंगा आणणारी एकमेव विभूती अर्थातच प्राचार्य शांताराम यशवंत ऊर्फ बाबासाहेब गव्हाणकर होय. गव्हाणकर यांनी १९६९ मध्ये सरस्वती विद्या मंदिर ही माध्यमिक शाळा सुरू केल्यामुळे आज सर्वच मुले, मुली शिक्षण घेऊन प्रत्येक क्षेत्रात भक्कमपणे स्थिरावले आहेत.

माथेरान : माथेरानमध्ये शिक्षणाची गंगा आणणारी एकमेव विभूती अर्थातच प्राचार्य शांताराम यशवंत ऊर्फ बाबासाहेब गव्हाणकर होय. गव्हाणकर यांनी १९६९ मध्ये सरस्वती विद्या मंदिर ही माध्यमिक शाळा सुरू केल्यामुळे आज सर्वच मुले, मुली शिक्षण घेऊन प्रत्येक क्षेत्रात भक्कमपणे स्थिरावले आहेत. बाबासाहेब यांनी येथे शिक्षणाचा पायाच रोवला. बाबासाहेब यांच्या पश्चात त्यांच्या आठवणींना उजाळा तसेच त्यांच्या महान कार्याचा लेखाजोखा भावी पिढीला स्मरणात राहावा यासाठी बाबासाहेब यांच्या नावाची ज्ञानज्योत माथेरानमधील सात पॉइंट्सच्या मध्यवर्ती भागातील वखारी नाका येथे असायला हवी अशी माजी विद्यार्थ्यांची अनेक वर्षांपासून मागणी होती. याबाबत सकारात्मकता नगरपालिके ने दाखविली नव्हती, मात्र ‘लोकमत’मध्ये ‘माथेरानमध्ये स्मारकाऐवजी कारंजांना प्राधान्य’ अशा मथळ्याखाली बातमी प्रसिध्द होताच नगरपालिकेने येथे सुध्दा ज्ञानज्योत बसविण्यात येणार असल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले.मागील दहा वर्षांपूर्वी वखारी नाका येथे ज्ञानज्योत बसविण्यासाठी भूमिपूजन सुद्धा करण्यात आले होते. याच भागात हॉटेल बाईक यांचा अनेक वर्षांपासून नगरपालिकेच्या हद्दीत नादुरुस्त अवस्थेतील कारंजा आहे. त्याची डागडुजी हॉटेलधारकाने केली नव्हती. त्यामुळे हा भाग जाण्या-येण्यासाठीही अडचणीचा ठरत होता. एवढ्या वर्षानंतर या कारंज्याच्या दुरु स्तीचे काम हॉटेलधारकाने हाती घेतल्यावर आजी -माजी विद्यार्थ्यांमध्ये नाराजी दिसून येत होती. कारंजा दुरु स्त होत आहे. मात्र बाबासाहेब यांच्या ज्ञानज्योती बाबतीत काहीच विचार नगरपालिका करीत नाही. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यावर नगरपालिकेने सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे स्थानिकांसह सर्वांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहेत. बाबासाहेब गव्हाणकर यांचे स्मारक या ठिकाणी होणार असल्याने विद्यार्थी आनंदित झाले आहेत.

टॅग्स :Matheranमाथेरान