शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

माथेरानच्या समस्यांवर सकारात्मक चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 07:18 IST

मागील काळातील अनेक विकासकामे अद्याप प्रलंबित असून, या रखडलेल्या कामांना सकारात्मकदृष्ट्या गती मिळावी, यासाठी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी केवळ माथेरानच्या मूलभूत समस्या आगामी काळात पूर्णत्वास जायला हव्यात

- मुकुंद रांजणेमाथेरान : मागील काळातील अनेक विकासकामे अद्याप प्रलंबित असून, या रखडलेल्या कामांना सकारात्मकदृष्ट्या गती मिळावी, यासाठी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी केवळ माथेरानच्या मूलभूत समस्या आगामी काळात पूर्णत्वास जायला हव्यात, यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे विशेष बैठकीचे आयोजन करण्याची मागणी केल्यानुसार बुधवारी तावडे यांच्या दालनात माथेरानच्या समस्यांबाबत आढावा बैठकीचे आयोजन करून सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी विविध महत्त्वपूर्ण प्रश्न या वेळी उपस्थित केल्यानंतर ते मार्गी लावण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे, नगरविकास राज्यमंत्री रणजितसिंग यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.सुट्ट्यांच्या हंगामात दस्तुरी नाका येथे गाड्यांच्या पार्किंगची जागा अपुºया प्रमाणात असल्याने वेळप्रसंगी गाड्या पार्क करता येत नाहीत, त्यामुळे पर्यटक माघारी जात असल्याने याचा एकंदरच येथील पर्यटनावर विपरीत परिणाम होत आहे. ही सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाची समस्या असून, तातडीने सुटावी यासाठी दस्तुरी येथील रिक्त असलेला एम.पी. प्लॉट क्र .९३ या भूखंडाचे हस्तांतर प्रक्रि या अंतिम टप्प्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. त्यामुळे पार्किंगची समस्या सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एमएमआरडीए माथेरानच्या दस्तुरी नाका ते पांडे प्ले ग्राउंडपर्यंतचा साडेपाच कि.मी.चा क्ले पेव्हर ब्लॉकचा रस्ता व चार पॉइंट्सचे सुशोभीकरण करणार आहे. या कामासाठी हरित लवादाकडे एफिडेव्हिट सादर करण्याचे निर्देश सनियंत्रण समितीने दिल्याने याबाबतची कायदेशीर प्रक्रि या पूर्ण करून कामास सुरुवात करण्यात येणार असल्याचे ज्येष्ठ अभियंता अरविंद ढाबे यांनी सांगितले. एमएमआरडीए १२३ कोटींची विकासकामे करणार आहे. सोंडेवाडी ते माथेरान व धोदाणी ते माथेरान या पर्यायी रस्त्याचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे मंत्री रणजितसिंग पाटील यांनी एमएमआरडीएला सांगितले.या वेळी नगरविकास राज्यमंत्री रणजितसिंगजी पाटील यांनीही माथेरानच्या विविध अडचणी जाणून घेतल्या. या विशेष बैठकीला नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, माथेरान नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सागर घोलप शिवसेनेचे गटनेते प्रसाद सावंत, विशेष कार्यकारी अधिकारी चारु दत्त शिंदे, महसूल कक्ष अधिकारी प्रशांत वाघ आदी उपस्थित होते.२६ जुलै २००५च्या अतिवृष्टीत घाट रस्त्यात भूस्खलन झाल्याने माथेरानचा जगाशी संपर्क तुटला होता. त्यामुळे पर्यायी रस्त्याची नितांत गरज असल्याचे नगरसेवक प्रसाद सावंत यांनी सांगितले. माथेरानच्या विविध विकासकामांंबाबतची विशेष बैठक नगरविकास राज्यमंत्री रणजितसिंग पाटील व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थित पार पडली.पर्यायी मार्गाबाबत एमएमआरडीए यांनी माथेरानचा संपूर्ण भौगोलिक अभ्यास करून मार्ग जाणाºया जागा कुणाच्या अखत्यारित येत आहेत. वनविभागाच्या, महसूल खात्याकडे की नगरपालिकेच्या हद्दीत येत आहेत. याची सविस्तरपणे माहिती संकलित करून अहवाल सादर केल्यास राज्य शासन विचार करू शकेल.- रणजितसिंग पाटील, नगरविकास राज्यमंत्री,महाराष्ट्रई-रिक्षाचा प्रस्ताव लवकरचमाथेरानच्या हातरिक्षाचालकांना अमानवीय प्रथेतून मुक्ती मिळावी, यासाठी पर्यावरण पूरक ई-रिक्षाचा प्रस्ताव लवकरच केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, नवी दिल्ली येथे पाठवण्यात येणार असल्याची ग्वाही पर्यावरण संचालक बी. एन. पाटील यांनी मंत्र्यांना दिली.आजची बैठक हातरिक्षाचालकांसाठी ऐतिहासिक ठरल्याचीभावना श्रमिक हातरिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदे यांनी व्यक्तके ली.ई-रिक्षामुळे रिक्षाचालकांना आरोग्यदायी व सन्मानाचे जीवन जगण्याची संधी मिळणार आहे. माथेरानच्या अनधिकृत बांधकामाची केस पुण्याच्या हरित लवादाकडे सुरू आहे. नगरपालिकेने ४२८ बांधकामांची यादी लवादाकडे सादर केली आहे.स्थानिक रहिवाशांनी या खटल्यात हस्तक्षेप करून बांधकामांचे पुन:निरीक्षण करण्याची मागणी करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

टॅग्स :Raigadरायगड