शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पोशीर-माले खचलेला रस्ता धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:07 IST

पोशीर-माले रस्ता पुराच्या पाण्यामुळे काही ठिकाणी वाहून जाऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे,

- कांता हाबळे नेरळ : पोशीर-माले रस्ता पुराच्या पाण्यामुळे काही ठिकाणी वाहून जाऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, तेव्हापासून महिनाभर हा रस्ता वाहतुकीस बंद होता. शेतकऱ्यांचे या रस्त्यामुळे दरवर्षी शेतीचे नुकसान होत असल्याने झालेल्या शेतीची नुकसानभरपाई द्या; नंतर रस्ता तयार करा, अशी भूमिका शेतकºयांनी घेतली होती. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात मातीचा भराव टाकून वाहने ये-जा करण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला होता; परंतु पुन्हा हा रस्ता चिखलमय आणि खड्डेमय झाला आहे. याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.नेरळ-कळंब रस्त्यावरील पोशीर-माले येथील रस्ता हा पुराच्या पाण्यामुळे दरवर्षी खचतो. त्यामुळे मातीचा भराव शेतात जात असल्याने शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे, असे असताना बांधकाम विभागाने त्या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी मोरी न टाकता मागील वर्षी रस्त्यावर डांबरीकरणाचे काम केले. या अगोदर येथे आरसीसी सिमेंट काँक्रीटची भिंती बांधण्यात आली होती. त्या भिंतीही कोसळल्या आहेत, त्यामुळे हा रस्ता पुन्हा धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरून माले, आसे, फराटपाडा, आर्डे येथील विद्यार्थी व नागरिक ये-जा करत असतात; परंतु नादुरुस्त रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.ज्या ठिकाणी रस्ता खचला होता त्या ठिकाणी भराव टाकण्यात आला होता. त्या ठिकाणी पुन्हा मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावर चिखल आणि खड्डे पडले आहेत. परिणामी, येथून दुचाकी जाणेही कठीण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने लवकरात लवकर हा रस्ता चांगल्या दर्जाचा करावा, अशी मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत-२ चे उप अभियंता जी. ए. गवळी यांच्याशी या रस्त्यासंदर्भात माहिती घेण्यासाठी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.>पोशीर-माले हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. उन्हाळ्यात या रस्त्याचे काम करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी दुरुस्ती करणे गरजेचे आहे. रस्ता बंद असल्याने आम्ही तात्पुत्या स्वरूपात मातीचा भराव आणि मोरी टाकून वाहने जाण्यासाठी रस्ता तयार केला होता. रस्ता तयार करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे.- पी. एस. गोपणे, शाखा अभियंता,जिल्हा परिषद बांधकाम विभाग, कर्जत>पुराच्या पाण्याने दरवर्षी हा रस्ता खचतो, यावर्षी मोठ्या प्रमाणात रस्ता खचून शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावर मातीचा भराव टाकून रस्ता तयार करण्यात आला होता; परंतु रस्त्यावर पुन्हा चिखल आणि खड्डे पडल्याने या रस्त्यावरून दुचाकी चालवणेही कठीण झाले आहे, असे असताना बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे.- हरिश्चंद्र वेहले, ग्रामस्थ, माले