शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

माणगाव एसटी स्थानकाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 01:11 IST

प्रवाशांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष; स्लॅब कोसळत असल्याने भीती

लोकमत न्यूज नेटवर्क माणगाव : मुंबई - गोवा महामार्गावरील माणगांव बसस्थानक हे मध्यवर्ती थांब्याचे ठिकाण आहे. या बसस्थानकातून पुणे, मुंबई, सुरत, रत्नागिरी यांसारख्या अनेक ठिकाणच्या बस थांबा घेऊन पुढे जातात. त्यामुळे माणगांव बसस्थानकात प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. मात्र, सद्यस्थितीत या बसस्थानकाची दुरवस्था झाल्याचे दिसून येते. 

माणगाव बसस्थानकाची इमारत जुनी झाल्याने तिचा स्लॅब कधीही कोसळेल, अशा अवस्थेत आहे. या भीतीमुळे प्रवासी बसस्थानकात बसायला घाबरतात . कारण एका स्लॅबचा मलबा दिनांक ५ मार्च रोजी प्रवासी बसण्याच्या आवारात पडला. सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. परंतु, एस. टी. महामंडळाला एखाद्या प्रवाशाचा जीव गेल्यावरच जाग येईल का, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे निसर्ग चक्रीवादळात बस स्थानकावरील शेड उडल्यानंतर स्लॅबच्या वरच्या बाजूस मलमपट्टी करून स्लॅब कुणाच्याही अंगावर पडू नये म्हणून बागकामच्या वापरात असलेल्या हिरव्या जाळ्यांचा वापर संरक्षण म्हणून केला गेला. मात्र, ज्या वेळेस स्लॅबचा मलबा खाली कोसळतो, त्यावेळी ती जाळी फाटून कोसळत असल्यामुळे महामंडळाकडून प्रवाशांची चेष्टा चाललेय का, असा प्रश्न पडतो. या जीर्ण इमारतीला दरवर्षी मलमपट्टी करून एस. टी. महामंडळ दिवस लोटत आहे. बसस्थानकाच्या बाजूला नवीन बांधकाम करण्यात आले आहे. मग बसस्थानकाची दुरुस्ती का केली जात नाही. प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत सुविधादेखील बसस्थानकात उपलब्ध नाहीत. पावसाळ्यात तर बसस्थानकासमोर तळे साचलेले असते. पाणपोई आहे. पण, पाणीच येत नाही. पंखेही बंद आहेत. साफसफाईचे कायम तीनतेरा वाजलेले असतात. प्रवाशांच्या गैरसोयीचा विचार करता  महामंडळाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

निसर्ग चक्रीवादळात बसस्थानक व माणगाव आगारावरील शेडचे नुकसान झाल्यामुळे बसस्थानकाचे बांधकाम निकृष्ट झाले आहे. या दोन्ही बांधकामांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असून, टेंडरदेखील निघाले आहे. स्लॅब कोसळल्याच्या दुसऱ्याच दिवशी सिव्हिल इंजिनिअरकडून या कामाची तातडीने पाहणी करण्यात आली आहे. पाणी व बांधकाम समस्यांचे लवकरच निवारण होऊन प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यास आम्ही प्रयत्नशील असू.- चेतन देवधर, आगार व्यवस्थापक, माणगाव एस. टी. आगार

टॅग्स :RaigadरायगडBus Driverबसचालक