शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नवीन उद्योगांना प्रदूषण मंडळाचा हिरवा कंदील

By admin | Updated: June 23, 2017 06:05 IST

पूर्वी डर्टीथर्टीच्या काळ्या यादीत बदनाम झालेल्या महाड औद्योगिक क्षेत्रातील सामूहिक सांडपाणी केंद्राने केलेल्या आमूलाग्र बदलांमुळे

लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : पूर्वी डर्टीथर्टीच्या काळ्या यादीत बदनाम झालेल्या महाड औद्योगिक क्षेत्रातील सामूहिक सांडपाणी केंद्राने केलेल्या आमूलाग्र बदलांमुळे, तसेच राबवलेल्या कठोर निर्बंधांमुळेच हे सामूहिक सांडपाणी केंद्र महाराष्ट्रात सर्वोत्तम ठरले. त्यांचा आदर्श महाराष्ट्रामधील अन्य सांडपाणी प्रक्रिया केंद्रानेही घ्यावा, असे आवाहन करताना, भविष्यात महाडचे हे सांडपाणी प्रक्रिया केंद्र राष्ट्रीय पातळीवरही आपल्या गुणवत्तेबाबत नावलौकिक मिळवेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. ए. एन. हर्षवर्धन यांनी केले.महाडच्या सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला ‘वसुंधरा पुरस्कार’ मिळाल्याबद्दल एमएसए सीईटीपीतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी नव्याने सुशोभीकरण करण्यात आलेल्या गार्डन व वातानुकूलित कॉन्फरन्स हॉलचेही डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.सांडपाणी केंद्राचा परफार्मन्स उत्कृष्ट असल्यामुळे नवीन रासायनिक कारखान्यासाठी महाड औद्योगिक क्षेत्रात हिरवा कंदील असेल, अशा उद्योगांना प्रदूषण मंडळाकडून कुठलीही अडचण निर्माण होणार नाही, अशी ग्वाहीदेखील डॉ. हर्षवर्धन यांनी या वेळी दिली. आम्ही ज्या ज्या औद्योगिक क्षेत्रातील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राना भेटी देतो, त्या वेळी त्या ठिकाणच्या संचालकांना महाडचे प्रक्रिया केंद्र बघून यात त्यांनी कशा सुधारणा केल्या, त्याचे निरीक्षण करा, असा सल्ला आम्ही देत असतो. सामाजिक जबाबदारीची जाणीव असल्यामुळेच महाड औद्योगिक क्षेत्रात प्रदूषणमुक्त वातावरण उद्योगांनी निर्माण केल्याचे हर्षवर्धन यांनी सांगितले. प्रक्रिया केंद्राचे अध्यक्ष संभाजीराव पठारे आणि सहकाऱ्यांनी घेतलेल्या अथक प्रयत्नांमुळेच या प्रक्रिया केंद्राला वसुंधरा पुरस्कार मिळाल्याचे सांगताना, प्रदूषणमुक्त वातावरण असेल तर निसर्गदेखील चांगली साथ देत असतो. महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांना सर्व प्रकारचे सहकार्य प्रदूषण मंडळाकडून केले जाईल, असेही हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले. प्रदूषण मंडळाचे वरिष्ठ अधिकार सोनटक्के यांनी महाडमधील उद्योगांनी अनेक अडचणींवर मात करीत आपला विकास साधला आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्याचे काम कारखानदारांनी करण्याची आवश्यकता आहे. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत, महाडच्या सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राने केलेली प्रगती कौतुकास्पद असल्याचेही सोनटक्के यांनी सांगितले. एमएमए सीईटीपीचे अध्यक्ष संभाजीराव पठारे म्हणाले की, आपल्या केंद्राला वसुंधरा पुरस्कार मिळाल्यामुळे येथील प्रत्येक उद्योगाची जबाबदारी आता वाढलेली असल्याचे सांगितले. प्रक्रिया केंद्राच्या सुधारणेसाठी आपण घेतलेल्या कठोर निर्णयामुळे कटुता निर्माण झाली होती. मात्र, त्यापेक्षा आज त्याची खऱ्या अर्थाने फ लश्रुती झाल्याचे समाधान लाभल्याचे पठारे यांनी सांगितले. त्यासाठी अनेक सकारात्मक निर्णय घेतले म्हणूनच हा नावलौकिक मिळाल्याचे पठारे यांनी स्पष्ट केले. या वेळी पर्यावरणतज्ज्ञ डॉ. सुधीर पटवर्धन, रमेश भोसले, जे. एच. पाटील, कार्यकारी अभियंता बाळासाहेब झंजे यांची भाषणे झाली. व्यासपीठावर उपाध्यक्ष अशोक तलाठी, के. व्ही. आपटे, पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, उपप्रादेशिक अधिकारी माने आदी उपस्थित होते.