शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
3
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
4
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ
5
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
6
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
7
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
9
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
10
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
11
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
12
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
13
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
14
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
15
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
16
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
17
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
18
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
19
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
20
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन

कर्जतमध्ये ३१ केंद्रांवर होणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:41 IST

कर्जत नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक रविवार, २७ जानेवारी रोजी होत आहे.

कर्जत : कर्जत नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक रविवार, २७ जानेवारी रोजी होत आहे. थेट नगराध्यक्षपदासाठी दोन आणि १८ सदस्य यांच्यासाठी मिळून ४५ उमेदवार रिंगणात असून २२,८६३ मतदार त्यातून १९ लोकप्रतिनिधी निवडणार आहेत. निवडणुकीसाठी ३१ ठिकाणी मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती कर्जत पालिका निवडणूक कार्यालयाने दिली आहे.पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १८ सदस्य निवडण्यासाठी ९ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. त्या प्रभागातून प्रत्येकी दोन सदस्य आहेत.पालिका निवडणुकीसाठी बनविण्यात आलेल्या प्रभागात सर्वात लहान प्रभाग दोन असून तेथे सर्वाधिक कमी २०६६ मतदार आहेत. तर सर्वाधिक मतदार प्रभाग क्रमांक ७ मध्ये असून तेथे ३१५२ मतदार आहेत. एकूण मतदारांमध्ये ११,१४६ महिला मतदार असून ११,७१७ पुरु ष मतदार आहेत. महिला मतदार ९ पैकी केवळ एका प्रभागात म्हणजे प्रभाग तीनमध्ये सर्वाधिक १४६६ आहेत. अन्य सर्व प्रभागात पुरु ष मतदारांची संख्या अधिक आहे.मतदान प्रक्रि येसाठी ईव्हीएम मशीन वापरल्या जाणार असून मतदान घेण्यासाठी पालिकेच्या नऊ प्रभागात ३१ मतदान केंद्रे बनविण्यात आली आहेत. प्रभाग एकमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगृह येथे दोन तर समाजमंदिरमधील व्यायामशाळा येथे तिसरे मतदान केंद्र असणार आहे. प्रभाग दोनमध्ये तीन मतदान केंद्रे असून त्यातील एक कृषी बाजार समिती दोन मतदान केंद्रे ही डोंबे विद्या निकेतनमध्ये असणार आहेत.प्रभाग तीनमधील दोन मतदान केंद्रे जनता शाळेत तर दोन मतदान केंद्रे ही जिल्हा परिषद शाळेत असणार आहेत. प्रभाग चारमध्ये चार मतदान केंद्रे असून इंग्लिश मिडीयम शाळेत दोन तर आकुर्ले येथील जिल्हा परिषद शाळेत दोन मतदान केंद्रे असणार आहेत.प्रभाग पाचमधील दोन मतदान केंद्रे शिशुमंदिर शाळेत आणि दोन मतदान केंद्रे कन्या शाळेत असणार आहेत. प्रभाग सहामधील दोन मतदार केंद्रे ही तेथील जिल्हा परिषद शाळेत आणि एक केंद्र हे कृषी संशोधन केंद्रात असणार आहे. प्रभाग सातमध्ये चार मतदान केंद्रे असून ती चारही मतदान केंद्रे ही जीवन शिक्षण मंडळ शाळेत आहेत.प्रभाग आठमध्ये तीन मतदान केंद्रे असणार आहेत,त्यातील दोन केंद्रे ही महिला मंडळ शाळेत तर एक नगरपालिकेच्या जुन्या कार्यालयात असणार आहे. प्रभाग नऊमध्ये असलेल्या तीन मतदान केंद्रांपैकी एक केंद्र गुड शेपर्ड शाळेत तर उर्वरित दोन मतदान केंदे्र ही गुंडगे येथील जिल्हा परिषद शाळेत आहेत.>कर्जतमधील ४ उमेदवार कोट्यधीशकर्जत नगरपरिषदेच्या निवडणुकीत ४ उमेदवार कोट्यधीश आहेत, तर आठ उमेदवार पाचवीपर्र्यंत शिक्षण घेतलेले आहेत. थेट नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा जोशी यांचे शिक्षण ग्रॅज्युएट आहे. त्यांच्याकडे ५० लाख २०५ रु पयांची जंगम मालमत्ता आहे तसेच ८ कोटी ९१ लाख ३९ हजार १२० रु पयांची स्थावर मालमत्ता आहे. प्रभाग- ९ ब मधून शिवसेनेकडून निवडणूक लढविणारे महेंद्र कानिटकर यांच्याकडे २४ कोटी २२ लाखांची स्थावर मालमत्ता आहे. प्रभाग -२ ब मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढणारे शरद लाड यांच्याकडे १ कोटी ७९ लाख ८१ हजार ६३ रु पयांची जंगम मालमत्ता आहे. १९ जागांसाठी ४५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामधील ८ उमेदवार पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रतीक्षा लाड वकील असून त्यांच्याकडे जंगम मालमत्ता १७ लाख ६२ हजार रु पये एवढी आहे. नगरसेवक उमेदवारामध्ये प्रभाग-२ अ मधून निवडणूक लढणाऱ्या भाजपाच्या सरस्वती चौधरी यांच्याकडे ४४ कोटी ७३ लाख ५० हजारांची स्थावर मालमत्ता आहे.