शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्ष महिला उमेदवाराच्या शोधात

By admin | Updated: November 16, 2015 02:18 IST

नगरपंचायत निवडणुकांचे वारे वाहू लागले असून सर्वच राजकीय पक्षांच्या गुप्त बैठका सुरू झाल्याने निवडणुकीचे वातावरणही तापणार आहे

पोलादपूर : नगरपंचायत निवडणुकांचे वारे वाहू लागले असून सर्वच राजकीय पक्षांच्या गुप्त बैठका सुरू झाल्याने निवडणुकीचे वातावरणही तापणार आहे. मात्र पोलादपूर नगरपंचायतीचे आरक्षण हे सर्वसाधारण महिला स्त्री राखीव जागेसाठी आरक्षित झाल्याने नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्या पुरुष उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. मात्र सर्वच राजकीय पक्ष आता सक्षम स्त्री उमेदवाराचा शोध घेत आहेत. सोमवारी (९ नोव्हेंबर) रायगड जिल्ह्यातील नगरपंचायतीचे आरक्षण मंत्रालयात जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षीयांच्या गुप्त बैठकांना जोर चढला असून निवडणुकांचे वातावरण तापू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली असून पोलादपुरात एकूण १७ प्रभाग व १७ नगरसेवकांची संख्या आहे. सद्यस्थितीत काँग्रेस व शिवसेना जोरात आहेत. तर भाजपा, मनसे, शेकाप व राष्ट्रवादी असे सर्वच राजकीय पक्ष १७ च्या १७ जागा स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवित आहेत. खरी चुरस काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षात होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. या नगरपंचायतीचे प्रभागनिहाय आरक्षण व सदस्यत्वाचे आरक्षण पडल्यावर अनेक इच्छुकांना नगराध्यक्षपदाचे वेध लागले होते. परंतु पोलादपूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची माळ स्त्री उमेदवाराच्याच गळ्यात पडणार हे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीमध्ये दिग्गज, रथी-महारथी निवडणूक मैदानात उतरतील यात श्ांका नसून आता सर्वांचे लक्ष नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम के व्हा जाहीर होतोय याकडे लागून राहिले आहे. इच्छुक महिला उमेदवारांच्या शोधात राजकीय पक्ष गुंतले आहेत.