शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्ष निवडणुकीसाठी सज्ज

By admin | Updated: October 10, 2016 03:37 IST

रायगड जिल्ह्यातील राजकारण नेहमीच स्फोटक राहिले आहे. या राजकीय मैदानातील मंडळी कोणत्या वेळी कोणती रणनीती आखतील आणि कोणाला सोबत करतील

आविष्कार देसाई / अलिबागरायगड जिल्ह्यातील राजकारण नेहमीच स्फोटक राहिले आहे. या राजकीय मैदानातील मंडळी कोणत्या वेळी कोणती रणनीती आखतील आणि कोणाला सोबत करतील याचा नेम नाही. नगर पालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा अशा एकामागून एक निवडणुका आगामी काळात येऊ घातल्या आहेत. जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व असणाऱ्या शेतकरी कामगार पक्ष-राष्ट्रवादी काँग्रेसने युतीची घोषणा केली आहे. शिवसेना, भाजपा यांनी एकला चलो रेचा नारा दिला असताना काँग्रेसने अद्यापही आपले पत्ते उघड केलेले नाहीत.मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवडणुका म्हणून स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे पाहिले जाते. नगर पालिकांची मुदत ही डिसेंबर महिन्यात संपत आहे, तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषेदेच्या निवडणुका या मार्च २०१७ मध्ये होऊ घातल्या आहेत. नगर पालिकेच्या प्रभाग रचनेनंतर त्यातील आरक्षणही जाहीर झाले आहे. या निवडणुकीत नगराध्यक्षही थेट निवडला जाणार असल्याने काही दिवसांपूर्वी सरकारने त्याचीही सोडत जाहीर केली आहे. त्यामुळे नगर पालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सर्वप्रथम पाहायला मिळणार आहे. नगर पालिकेच्या निवडणुकीत उडणारा राजकीय धुराळा खऱ्या अर्थाने पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपर्यंत खाली बसणार नाही.जिल्हा परिषदेवर शेकाप- राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आणि शेकापचे जयंत पाटील यांच्या मैत्रीचे संबंध पुन्हा जुळून आल्याने त्यांची युती याही निवडणुकीत अभेद्य राहणार असल्याचा पुनरुच्चार दोन्ही नेत्यांनी केला आहे. दोन्ही दिग्गज नेते एकत्र असल्याने शिवसेना, भाजपा, काँग्रेसच्या उरात पुन्हा धडकी भरल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ग्रामीण राजकारणावर चांगलीच पकड आहे. त्यांना खऱ्या अर्थाने शिवसेनेसोबतच टक्कर द्यावी लागणार आहे. भाजपाला या निवडणुकीत मेहनत घ्यावी लागणार आहे. पिछाडीवर असणाऱ्या काँग्रेसलाही अपार कष्ट करावे लागणार आहेत. काँग्रेसने आपापसातील मतभेद विसरुन एकदिलाने लढा दिल्यास सत्ताधाऱ्यांना मिळणाऱ्या मोकळ््या रानावर निर्बंध येऊ शकतात. काँग्रेस आपापसात लढत राहिल्यास सत्ताधाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे हे काँग्रेसने आताच ओळखले पाहिजे, अन्यथा पुन्हा एकदा आघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस विकास कामांच्या जोरावर ग्रामीण जनतेपुढे जाणार आहे परंतु सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत केलेल्या बोगस विकास कामांचा पर्दाफाश करण्याची तयारी काँग्रेसचे अलिबागमधील माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी सुरु केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात त्यांनी फुंकलेले रणशिंग जिल्ह्यातील काँग्रेसला उभारी देऊ शकते. तर दुसऱ्या बाजूला शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीत काँग्रेसला सामावून घेण्यात येत असल्याची राजकीय चर्चा आहे.सुनील तटकरे आणि जयंत पाटील हे स्वार्थी राजकारणासाठी एकत्र आल्याची घणाघाती टीका शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई यांनी रोहे येथे केली होती. त्यामुळे शिवसेना तटकरे-पाटील या जोडगोळीलाच आपले लक्ष्य करणार असल्याचे दिसून येते. भाजपानेही एकाकी लढण्याचे मनसुबे आखले आहेत.