शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

नागोठणेत निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 01:34 IST

निवडणूक २७ फेब्रुवारीला होत असून, शुक्र वारी सायंकाळी निवडणूक आयोगाच्या वतीने उमेदवारांना निशाणी देण्यात आल्यानंतर रविवारपासून संबंधित राजकीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ते प्रचाराला लागले आहेत.

नागोठणे : ग्र्रामपंचायतीची निवडणूक २७ फेब्रुवारीला होत असून, शुक्र वारी सायंकाळी निवडणूक आयोगाच्या वतीने उमेदवारांना निशाणी देण्यात आल्यानंतर रविवारपासून संबंधित राजकीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ते प्रचाराला लागले आहेत. सरपंचपदासह काही प्रभागांत तिरंगी लढती होणार असल्याने तीनही आघाड्यांची दमछाक होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना-काँग्रेस सत्ताधारी आघाडीची जनसेवा आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप आघाडीची नागोठणे बचाव आघाडी अणि भाजपा पुरस्कृत नागोठणे विकास आघाडी अशी तिरंगी लढत होत आहे. निवडणुकीत सेनेने विद्यमान सदस्य डॉ. मिलिंद धात्रक यांना, तसेच राष्ट्रवादी-शेकाप आघाडीने माजी सदस्य बाळासाहेब टके, तर भाजपाने सेनेचे रोहे तालुका संघटक तथा माजी सरपंच विलास चौलकर यांना सरपंचपदाची उमेदवारी दिली असल्याने ही लढत चुरशीची होईल, असे बोलले जात आहे. सदस्यपदाच्या १७ जागांसाठी सहा प्रभागांतून ४२ उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग २ आणि ५मध्ये सरळ लढती असल्या, तरी उर्वरित चार प्रभागांमध्ये बहुरंगी लढती होत आहे. सेनेने पाच विद्यमान सदस्यांना पुन्हा रिंगणात उतरविले आहे. सेनेचे विद्यमान सदस्य प्रकाश मोरे यांना सेनेने पुन्हा तिकीट नाकारल्याने भाजपा आघाडीतून ते पुन्हा रिंगणात उतरले असल्याने, प्रभाग ६मधील लढत निश्चितच रंगतदार होणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीने दोन विद्यमान सदस्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली असल्याने, सरपंचपदासह नऊ विद्यमान सदस्य पुन्हा एकदा जनमत अनुभवत असल्याचे स्पष्ट होत आहे.