शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

पोलीस-ग्रामस्थांनी केली भरकटलेल्या ट्रेकर्सची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 03:08 IST

नेरळ गावाच्या मागे आणि माथेरानच्या डोंगर रांगेत असलेल्या विकटगड अर्थात पेब किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी येत असतात.

कर्जत : नेरळ गावाच्या मागे आणि माथेरानच्या डोंगर रांगेत असलेल्या विकटगड अर्थात पेब किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी येत असतात. रविवारी ट्रेकिंगसाठी पेब किल्ल्यावर आलेले तरुण वाटेतच भरकटले. अखेर नेरळ पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने तिन्ही तरुणांना शोधून सुखरूप नेरळ येथे आणले.मूळचे गुजरातमधील असलेले देवर्षी विरमाराज, केतन कीर्ती भानुशाली, लक्ष्मीकांत सुरण साकी हे तीन तरुण नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईमध्ये राहत आहेत. त्यांनी ट्रेकिंगसाठी पेब किल्ल्यावर जाण्याचे नियोजन केले. त्यासाठी इंटरनेटवरून माहिती घेतली. शनिवारी रात्री मुंबई येथून निघून नेरळ रेल्वेस्थानकात पोहोचले. स्थानकात विश्रांती घेऊन ते तिघे पेब किल्ल्यावर जाण्यास निघाले. पहाटे ५ वाजता नेरळ गावातून मोहाची वाडी आणि तेथून आनंदवाडी असे पेब किल्ला चढू लागले. सकाळी ६ पूर्वी पेब किल्ला चढू लागल्याने आनंदवाडीमधील कोणीही आदिवासी लोकांनी त्यांना पेब किल्ल्याकडे जाताना पाहिले नाही.पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी जाणारे ट्रेकर्स हे आनंदवाडी येथून रस्ता दाखवण्यासाठी गाइड घेऊन जात असतात. किल्ल्यावर डोंगर चढून जाताना अर्धे अंतर पार केल्यानंतर त्यांना रस्ताच सापडत नव्हता. शेवटी त्यातील एका तरुणाने ९.३० वाजता १०० क्रमांकावर फोन करून, भटकटल्याची माहिती पोलिसांना दिली. नेरळ पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार अवंती पाटील यांनी त्याबाबत माहिती प्रभारी अधिकारी सोमनाथ जाधव यांना दिली. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांची शोधमोहीम सुरू झाली. सायंकाळी ४.३०च्या सुमारास या तिघांचा शोध घेण्यात यश आले.