शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

सोनसाखळी चोरांना रोखण्यासाठी पोलिसांचा ‘ट्रॅप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 23:35 IST

प्रमुख बाजारपेठांमध्ये बसवणार बॅरिकेड्स : दामिनी पथकासह मोबाइल वाहनातून पेट्रोलिंगवर भर

अलिबाग : काही दिवसांत सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठा चांगल्याच सजल्या आहेत. येत्या कालावधीत विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढणार आहे.

या वाढलेल्या गर्दीचा फायदा घेऊन सोनसाखळी (चेन स्नॅचिंग)च्या घटनांमध्ये वाढ होते. त्याला आळा घालण्यासाठी रायगड पोलिसांनी बाजारपेठांच्या येण्या-जाण्याच्या दोन्ही एन्ट्री पॉइंटवर बॅरिकेड्स लावली आहेत. त्याचप्रमाणे या कालावधीत तेथे पोलीस कायमस्वरूपी तैनात करण्यात येणार आहेत. दामिनी पथकांच्या फेऱ्यांमध्येही वाढ करण्यात येणार असल्याने चोरट्यांवर करडी नजर राहणार आहे.उत्सवाच्या दरम्यान महिला घराबाहेर पडताना दागिने अंगावर परिधान करतात. मात्र, या दिवसांत सोनसाखळी चोरीच्या प्रमाणात वाढ होते. याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी विविध उपाययोजना अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. बाजारपेठेत असलेल्या गर्दीचा फायदा घेत सोनसाखळी चोर दागिने चोरून नेतात. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान असायचे. मात्र, या वर्षी या साºया घटनांपासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. बाजारपेठांमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच बाजारपेठ परिसरात चारचाकी वाहन नेण्यास मनाई केली आहे. त्यामुळे नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

अलिबाग महावीर चौकातील फुलोरा हॉटेल परिसरात बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. ठिकरु ळ नाका, केळकर नाका, शिवाजी चौक, जामा मशीद परिसर, मारु ती नाका अशा बाजारपेठांच्या प्रवेशद्वारावरच हे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. एखाद्या चोरट्याने दागिने लांबवण्याचा प्रयत्न केला तर तो बॅरिकेड्स लावल्यामुळे पळून जाऊ शकणार नसल्याने लगेचच सापडणार आहे.त्यामुळे या वर्षी उत्सवादरम्यान सोनसाखळी चोरीचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळणार असल्याचे अलिबाग पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. 

गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाहेर पडताना महिलांनी सोन्याचे दागिने घालून बाहेर पडू नये, त्याबरोबरच कोणत्याही मौल्यवान वस्तू सोबत घेऊ नये, आपल्या हातातील पैशांची पर्स व्यवस्थित सांभाळावी. त्याचप्रमाणे मोफत वस्तू, साड्या वाटत आहेत, अशा भूलथापांना बळी पडू नये, असे केल्यास चोरीच्या घटनांमध्येही घट होण्यास मदत मिळेल.- के . डी. कोल्हे, पोलीस निरीक्षक, अलिबाग