शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
2
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...
3
Israel Iran Conflict : इस्त्रायली हल्ल्यात इराणमध्ये दोन भारतीय विद्यार्थी जखमी; भारताने परत आणण्याची तयारी केली, या मार्गाने आणले जाणार
4
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
5
७२ तासांच्या युद्धात भीषण विध्वंस! ४०६ इराणींचा मृत्यू, इस्रायलचे किती नुकसान? जाणून घ्या...
6
VIDEO : 'मी घरीच आहे अन्...', लाइव्ह कॅमेरॅवरच डेल स्टेनला रडू कोसळलं; नेमकं काय घडलं?
7
शूटिंगसाठी निघालेल्या मॉडेलची निर्घृण हत्या;मृतदेह कालव्यात फेकला, टॅटूवरून पटली ओळख
8
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
9
Pune Bridge Collapse: पुलाखाली अडकलेल्यांना काढले; पुलाचा सांगाडा काढण्यास चार क्रेन
10
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
11
इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स, इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये घबराट
12
'अनेक वेळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
13
G20 च्या पडद्यामागील हिरो अमिताभ कांत यांचा राजीनामा! ४५ वर्षांच्या सेवेला का दिली पूर्ण विराम?
14
संजय कपूर यांचा शेवटचा फोटो समोर, कॅप्टनसोबत हसताना दिसले; पोलो खेळतानाच गेला जीव
15
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
16
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
17
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
18
Monsoon Picnic: सध्या पावसाळी सहलीला जाताना जरा सांभाळूनच; वाचा 'ही' मार्मिक कथा!
19
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
20
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पोलीस पाटलांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 00:55 IST

Khalapur : नाताळ आणि थर्टी फर्स्ट साजरी करण्यासाठी महानगरातील गर्दी रायगडात होऊ शकते.

वावोशी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्रीच्या संचारबंदीचे आदेश लागू केल्याने सरत्या वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी महानगरातील गर्दी खालापूर तालुक्यातील विविध भागांत होऊ शकते. या पार्श्वभूमीवर खालापूरमध्ये पोलीस पाटलांची बैठक घेत फार्महाउसवर होणाऱ्या रेव्ह पार्ट्या तसेच गावात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठीची जबाबदारी देत थर्टी फर्स्टवर करडी नजर ठेवण्याचे आदेशच दिले आहेत.नाताळ आणि थर्टी फर्स्ट साजरी करण्यासाठी महानगरातील गर्दी रायगडात होऊ शकते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पोलिसांना सक्त आदेश दिल्यामुळे खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, खालापूरचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी पोलीस पाटलांची बैठक तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केली होती. या वेळी खालापूर पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस पाटील उपस्थित होते. डीवायएसपी संजय शुक्ला यांनी उपस्थित पोलीस पाटलांच्या अडचणी जाणून घेतल्या. खालापूर तालुक्यातील हॉटेल, फार्महाउस आणि खेडेगावांमध्ये होणाऱ्या रेव्ह पार्ट्या, सरत्या वर्षाचा आनंद व्यक्त करण्यासाठी रात्रीचे डीजे वाजविणे अशा कार्यक्रमांवर बंदी असून, गर्दी टाळण्यासाठी सामाजिक अंतर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर खालापुरातील पोलीस पाटलांनी सहकार्य करावे असे आवाहनही पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी  केले आहे.

टॅग्स :Raigadरायगड