शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

सायबर गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:36 AM

सध्या स्मार्टफोन व इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली.

- गिरीश गोरेगावकर माणगाव : सध्या स्मार्टफोन व इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली. मात्र, गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आलेले नाही. किंबहुना गुन्ह्यातील आरोपी मोकाटच आहेत. रायगडमधील २०१८ मध्ये घडलेल्या ५३ गुन्ह्यांतील १२ गुन्ह्यांची उकल होऊन ४१ गुन्हे अजून उघडकीस आले नाहीत. यामुळे पोलीस यंत्रणा सायबर गुन्ह्याची उकल करण्यात अपयशी ठरले आहेत.एटीएम खात्यातून पैसे लंपास करणे, लॉटरी लागल्याच्या आमिषाने फसवणूक, क्रे डिट कार्डचा सांकेतिक शब्द चोरून त्याद्वारे खरेदी करणे, फेसबुकवर बदनामी करणे किंवा अश्लील मजकूर टाकणे अशा अनेकविध तक्र ारी रायगड पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे नागरिकांकडून केल्या जात आहेत. डिजिटल इंडिया संकल्पनेतून सुरू झालेले कॅशलेस व्यवहार आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आॅनलाइन गुन्हे वाढू लागले आहेत. ओळख लपवून इंटरनेटवर गंभीर गुन्हे सहज करता येतात. एटीएम स्कीमिंग, आॅनलाइन आर्थिक फसवणुकीचे गुन्हे अशा गुन्ह्यांचा तपास करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. मागील तीन वर्षांतील जिल्ह्यातील सायबर गुन्ह्यांची संख्या पाहता फक्त २२ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वरित गुन्ह्यांतील आरोपी अद्यापही मोकाट आहेत.बँकेच्या आर्थिक गैरव्यवहारातील आरोपी हे परराज्यातील असल्याने त्यांना पकडण्यासाठी उशीर होतो. बऱ्याचशा बाबी या तांत्रिक असल्याने त्याची तपासणी व्हायला वेळ लागतो. मात्र, जिल्ह्यात गुन्हे डिटेक्शनचे प्रमाण चांगले असल्याची माहिती पोलीस जिल्हा अधीक्षक अनिल पारसकर यांनी‘लोकमत’ला बोलताना दिली.।या गुन्ह्याची उकल करण्यास उशीर होण्याचे कारण गुन्हा तपासात जे सर्व्हर असतात ते परदेशी असतात, तेथून माहिती मागविताना उशीर होतो. तसेच पूर्वी सीमकार्ड बनावट नावाने विकली जात होती, ती आता बनावट सीम कार्ड विक्र ी बंद झाली आहे. २०१६ साली सायबर सेल लॅब चालू झाली आहे. याबाबत पोलिसांची ट्रेनिंग पूर्ण झाली आहे. त्यामुळे या गुन्ह्याची उकल भविष्यात लवकर होईल.- अनिल पारसकर,जिल्हा पोलीस अधीक्षक,अलिबागनागरिकांनीच जागरूक व्हावेरायगड पोलीस दलातील सायबर सेलचे पोलीस निरीक्षक एन. एम. गवारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, इंटरनेटद्वारे आर्थिक व्यवहारात दक्षता बाळगावी. मोबाइलवर आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लीक करू नये, जाणकारांकडून आर्थिक व्यवहार माहीत करून घ्यावे. बँक अधिकाºयांनी देखील नागरिकांना बँकिंग व्यवहाराची माहिती द्यावी.