रोहा : दोन दिवसांपूर्वीच तालुका परिसरात मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा करणाऱ्या आरोपींना गजाआड करण्यात रोहा पोलिसांना यश आले होते. यामधील मुख्य सूत्रधार असणारा आरोपी आसिफ सुपारीवाला हा अद्याप फरार आहे. अटक केलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीवरून रोहा पोलिसांनी चणेरा येथील कासार बिल्डिंगमधील दोन नंबरच्या गाळ्यावर धाड टाकली असता पोलिसांना गुटखा बनविण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री तसेच विविध प्रकारची केमिकल्स आढळून आल्याने पोलिसांनी पंचनामा करून यंत्रसामुग्री व इतर सामान जप्त केले. तसेच संबंधित गाळ्याला सील ठोकले आहे.गुटखा खाण्यामुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या कार्यकाळात गुटखा विक्र ीवर बंदी आणली होती. परंतु पैशाचा हव्यास असणारी काही मंडळी तरुण पिढीला बर्बाद करण्यासाठी गुटखा विक्र ीचे रॅकेट चालवून आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईत २९ लाख रुपयांचा गुटखा, ४० टेम्पो, टाटा मांझा कार यापूर्वीच ताब्यात घेतली आहे. शनिवारी केलेल्या कारवाईत सुपारी बारीक करण्याचे मशिन, सुपारी भाजण्याचे मशिन, मिक्सर कम रोटर तसेच गुटखा बनविण्यासाठी लागणारी विविध केमिकल्स व घातक पावडर पोलिसांनी जप्त के ली. परप्रांतीय तरुण भंगार जमा करण्याच्या नावाखाली गावोगाव फिरून गुटखा विक्र ी स्थानिक पानवाले व व्यापारी यांना करीत असल्याची माहिती समोर आली आहे. (वार्ताहार)
गुटखा रॅकेटवर पोलिसांची कारवाई
By admin | Updated: May 29, 2016 03:01 IST