शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलादपूर बसस्थानक समस्यांच्या गर्तेत; प्रवासी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 00:11 IST

लांब पल्ल्यांच्या एसटीमुळे होते गर्दी; गाडी शोधताना होते धावपळ

पोलादपूर : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे पोलादपूर बसस्थानक येथून तळ कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई, ठाणे, महाबळेश्वर आदी ठिकाणी धावणाऱ्या एसटी बसेसमुळे कोकणातील पोलादपूर बसस्थानक हे अत्यंत महत्त्वपूर्ण असे मानले जाते. मात्र, हे बसस्थानक नेहमी समस्यांच्या गर्तेत अडकले आहे.पोलादपूर बसस्थानकात असणारी कॅन्टीनमुळे या ठिकाणी बहुसंख्येने एसटी बस येथे थांबत असतात. मात्र, पोलादपूर स्थानकात लांब पल्ल्याच्या ज्या एसटी बसेसला थांबा देण्यात आला आहे. अशाच बस या स्थानकात थांबवाव्यात मात्र तसे न होता लांब पल्ल्याच्या धावणाऱ्या सर्व एसटी बसेस या ठिकाणी चहा, नाश्ता व जेवणासाठी थांबत असल्याने या स्थानकात नेहमीच गर्दी होत असते. या ठिकाणी ग्रामीण एसटी बसेसच्या फेऱ्या, स्थानिक प्रवासी आणि लांब पल्ल्याच्या बसमधील प्रवास करणारे प्रवासी यामुळे स्थानकात प्रचंड गर्दी होताना दिसून येते.या गर्दीमुळे ग्रामीण भागातील असणाऱ्या एसटीच्या फेऱ्या आणि स्थानिक प्रवाशांना या गर्दीतून आपली बस शोधावी लागते आणि आपली बस कधीकधी चुकते त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना काही तास खोळंबा होऊन या मार्गावर जाणारी दुसरी बस शोधावी लागते. त्यामुळे स्थानिक प्रवासी जनतेतून याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.ब्रेकडाऊनचे वाढते प्रमाणमहाड आगार मार्फत पोलादपूर बसस्थानकात पुरविली जाणारी एसटी सेवा मात्र एसटी बसच्या जुनाट गाड्यांमुळे आणि पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील झालेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढले आहे ग्रामीण भागातील एसटी बसेस वारंवार ब्रेकडाऊन होत असल्याने या विभागातून येणारे शाळा कॉलेजचे विद्यार्थी आणि प्रवासी जनता यांना नेहमीच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने किमान तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेऊन चांगल्या नवीन एसटी बसेस या मार्गावर देऊन जनतेची गैरसोय टाळणे गरजेचे बनले आहे.पोलादपूर स्थानकात जागेचा अभावमहामार्गावरील अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे पोलादपूर स्थानक मात्र या स्थानकात जागा अतिशय कमी असल्यामुळे आणि ग्रामीण सर्वच लांब पल्ल्याच्या एसटी बसेस या ठिकाणी थांबत असल्याने प्रचंड गर्दीचे प्रमाण वाढलेले दिसून येते त्यातच गणेशोत्सव, शिमगोत्सव असे महत्त्वाचे समजले जाणारे कोकणातील सण - उत्सव आणि येणाऱ्या-जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती संख्या नेहमीच गर्दीचे प्रमुख कारण बनले आहे.या स्थानकात असणारे शौचालय गेल्या महिन्यात महामार्गावरील कामामुळे रस्त्यावरील गटारात मातीचा भरव टाकल्यामुळे गटार तुंबून शौचालयाचे पाणी थेट बसस्थानक परिसरात वाहून जात असल्याने स्थानकात सर्वत्र दुर्गंधी पसरली होती.त्यामुळे स्थानिक व्यावसायिक हातगाडी आणि टपरीधारक त्रस्त झाले होते. अशा एक ना अनेक समस्या या स्थानकात नेहमीच दिसून येत आहे.