शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पोलादपूरची ४६ गावे, १२३ वाड्यांमध्ये टंचाई?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 00:25 IST

कोकण हा जलसमृद्ध परिसर असला, तरी गेल्या काही वर्षांत कोकणातही जानेवारीनंतर टँकर फिरतात हे वास्तव आहे.

पोलादपूर : कोकण हा जलसमृद्ध परिसर असला, तरी गेल्या काही वर्षांत कोकणातही जानेवारीनंतर टँकर फिरतात हे वास्तव आहे. अगदी यंदाही नुकतेच जे टंचाईग्रस्त तालुके जाहीर झालेत, त्यात रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्याचा समावेश आहे. तालुक्याचे जलवैभव टिकवून ठेवण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची गरज आहे. यंदा पोलादपूर तालुक्यात १ एप्रिल २०२० ते ३० जून २०२० या कालावधीत पाणीटंचाई कृती आराखड्यामध्ये ४६ गावे आणि १२३ वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे.गत वर्षी एप्रिल ते जूनपर्यंत टंचाई निवारण कृती आराखड्यात २३ गावे आणि १६३ वाड्यांचा समावेश होता. मात्र, यंदा टंचाई आराखड्यात गावांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. पोलादपूर तालुक्यात ग्रामीण भागात महिला आणि ग्रामस्थांचे पाणीटंचाईमुळे अतोनात हाल होणार आहेत. यंदाच्या पाणीटंचाई कृती आराखड्यात टँकर आणि बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ४६ गावे आणि १२३ वाड्यांची मागणी निश्चित करण्यात आली असून, १६९ ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी ४२.२५ लाखांची तरतूद टंचाई आराखड्यात करण्यात आली आहे. दरम्यान, उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुका प्रशासन सज्ज असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.गेल्या वर्षी २३ गावे, ११८ वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा भीषण दुष्काळ पडला होता. यात दुर्गम, अतिदुर्गम भागातील गावपाड्यांची संख्या अधिक असून, महिलांना हंडाभर पाण्यासाठी रणरणत्या उन्हात रानोमाळ भटकावे लागत आहे.मागील दहा वर्षांत गाववाड्यांवर विंधन विहिरी, विहिरींची दुरुस्ती, साठवण टाकी, नळ पाणीपुरवठा योजना, छोटे तलाव आदी विकासकामांवर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद रायगड यांच्यामार्फत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, पाणी प्रश्न सुटला नाही.।पाणीटंचाईने त्रस्त गावेटंचाईग्रस्त ४६ गावांमध्ये चांभारगणी बु. व खुर्द, किनेश्वर, निवे, ताम्हाणे, आड, कुंभळवणे, कुडपण खुर्द व बुद्रुक, तुटवली, क्षेत्रफळ, कोतवाल खुर्द व बु., तामसडे, बोरघर, काटेतळी, वाकण गावठाण, पितळवाडी, नानेघोळ, ओंबळी गावठाण, गोवले, खोपड, बोरज, कापडे खुर्द, कातळी बंगला, महाळुंगे, महालगुर, गोलदारा आदीचा समावेश आहे. तर तालुक्यातील १२३ वाड्यांमधील २० हजार ५४ लोकसंख्येला भासणारी तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई निवारण करण्याचे आव्हान उभे आहे.