शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

उत्खननामुळे नांदगाव किनाऱ्याची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 00:16 IST

महसूल विभागाने कडक कार्यवाही करण्याची ग्रामस्थांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमुरुड : तालुक्यातील  नांदगाव समुद्र किनारी महसूल खात्याचा वचक नसल्याने राजरोसपणे समुद्र किनाऱ्यावरील  वाळू उपसा करणाऱ्यांची चांदी झाली असून बकळ पैसा वाळू उत्खननाने कमावला जात आहे.वाळू उत्खननाने सातत्याने  होत राहिल्याने नांदगाव समुद्र किनारी मोठे मोठे खड्डे पडले आहेत. त्याचप्रमाणे समुद्रकिनारा विद्रूप झाला आहे.  वाळूच्या सततच्या उत्खननामुळे नांदगाव समुद्र किनाऱ्यावरील ५०० मीटर पेक्षा जास्त किनाऱ्याची धूप झाली असून जवळच असणाऱ्या नारळी सुपारीच्या बागांना मोठा धोका पोहाेचत आहे. ही वाळू नांदगाव किनाऱ्यावरून पहाटे ३ च्या सुमारास काढली जाते. मुरुड पोलिसांनी पहाटे गस्त वाढवून या वाळू चोरांना पकडून कडक शासन करावे अशी मागणी सुद्धा ग्रामस्थांकडून केली जात आहे. सततच्या वाळू उपशामुळे गणपती गौड येथील स्मशानभूमीचे अस्तित्व सुद्धा धोक्यात आले आहे. वाळू काढल्याने संरक्षक भिंती सुद्धा पडत आहेत. वाळूच्या अवैध उत्खननामुळे नागरिक  त्रस्त असून महसूल खात्याने कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.  समुद्र किनाऱ्यावरील  वाळू ही  बांधकामासाठी वापरली जात असल्याने असंख्य लोक या वाळूचा उपयोग करीत असतात. त्यातच वाळू अगदी जवळ मिळत असल्याने वाळू उत्खनन राजरोसपणे करीत आहेत. समुद्र किनाऱ्यावरील वाळू काढल्याने काही ठिकाणचा भराव सुद्धा ढासळला आहे. ही वाळू बैलगाड्यांतून अथवा टेम्पोने वाहतूक केली जात आहे.सातत्याने समुद्रावरील वाळू काढल्याने काही ठिकाणच्या नारळ -सुपारीच्या बागायत जमिनीला सुद्धा धोका पोहचला आहे. महसूल खात्याने लक्ष देऊन वाळू उत्खनन रोखावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याबाबत माजी सरपंच विद्याधर चोरघे यांनी नांदगाव समुद्र किनारी सातत्याने वाळू उपसा झाल्याने जागो जागी खड्डे पडले आहेत. गोविंद प्रधान यांच्या मालकीच्या बागायत जमिनीतील सुमारे शंभरच्यावर नारळाची झाडे पडली आहेत. तर गणेश चोरघे यांच्या बागायत जमिनीतील ३० पेक्षा जास्त नारळाची झाडे पडली आहेत. सततच्या वाळू उपशामुळे नांदगाव समुद्र किनारा खड्डेमय झाला आहे. महसूल खात्याने तातडीने लक्ष्य देऊन वाळू नेणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे. असेच वाळू उत्खनन सुरु राहिले तर बागायत जमिनी नामशेष होणार आहेत. महसूल खात्याने सजग होऊन अशा लोकांवर कडक कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे.

वाळू चोरणाऱ्यांवर महसूल खात्याचे लक्ष असून आम्ही तपासणी पथक सुद्धा तैनात केले आहेत. आतापर्यंत काही लोकांना पकडून त्यांच्याकडून दंड सुद्धा वसूल करण्यात आलेला आहे. नांदगाव बाबतची समस्या निराकरण करण्यासाठी गस्त वाढवून लवकरच वाळू चोरणाऱ्यांवर कार्यवाही केली जाईल.- गमन गावित, तहसीलदार, मुरुड