शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जनावर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:36 IST

दिवेआगारमधील ग्रामसभेत निर्णय; पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी संकल्प

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन स्थळ असणाऱ्या दिवेआगर ग्रामपंचायतीतर्फे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जनावर बंदी घालावी, यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. दिवेआगर ग्रामपंचायतीने मंगळवारी परिसरातील संबंधित ग्रामपंचायत व गणेशमूर्तिकार तसेच कारखानदार यांना एकत्रित निर्णय घेण्यासाठी सभेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.दिवेआगर व बोर्लीपंचतन येथील समुद्रकिनारी परिसरातील हजारो गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. बाजारातल्या बहुतांश मूर्ती या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनलेल्या असतात. विसर्जनानंतर त्या विरघळत नाहीत. दुसºया दिवशी मूर्तीचे भग्न अवशेष किनारी पडलेले असतात. त्याची विटंबना होऊ नये व पर्यावरणाचा ºहास थांबवावा, या अनुषंगाने विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला दिवेआगर सरपंच उदय बापट, बोर्लीपंचतन सरपंच नम्रता गाणेकर, ग्रामपंचायत सदस्य सायली गाणेकर, भूमी कांबळे, नुजहत जहांगीरदार, संतोष कांबळे, ग्रामसेवक शंकर मयेकर, मूर्तिकार अनिल शिरकर, चंद्रकांत गोविलकर, कांदळवन प्रतिष्ठानचे संदेश अंभोरे, वंदन झवेरी, मोहन उपाध्ये, विराज दाभोळकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेत सर्वानुमते चर्चा करून, समुद्रामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विसर्जनाला बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. दिवेआगर ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने या पर्यावरणपूरक निर्णयाचे उपस्थितांकडून स्वागत करण्यात आले. याशिवाय शाडूच्या मूर्तींची निर्मिती सर्व कारखानदारांनी करावी व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बाहेरून आणल्या जातात. त्याच मूर्ती शाडू मातीने येथील कलाकारांनी बनविल्या तर स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळून आपली कला जिवंत राहील व रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल, असे सुचविण्यात आले.काही कारखानदारांनी आपल्या अडचणी सभेत मांडल्या, तर काही मूर्तिकारांनी या निर्णयाचे स्वागत केले.पर्यावरण रक्षणाच्या उद्देशाने प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जनावर बंदी घालून शाडूमातीचा मूर्तीसाठी वापर करून पर्यावरणाचे मोठे नुकसान आपण टाळू या, असा संकल्प दिवेआगार ग्रामपंचायतीकडून करण्यात आला आहे.