शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वनक्षेत्रात नववर्ष स्वागत पार्टीचा बेत आखताय, मग होऊ शकते कारवाई

By राजेश भोस्तेकर | Updated: December 29, 2023 14:58 IST

वन विभागाची राहणार करडी नजर

अलिबाग : नव वर्ष स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण  पार्टीचे बेत आखत आहे. नववर्ष स्वागतासाठी निवांत ठिकाण असलेल्या वनक्षेत्रात पार्टीचे बेत आखत असाल तर सावधान तुमच्यावर वन विभागाची करडी नजर राहणार आहे.  वनक्षेत्रातील गडकिल्ले, समुद्रकिनारी कांदळवनक्षेत्र किंवा त्याचे लगत, वनक्षेत्रातील शासकीय निवासस्थाने व प्रत्यक्ष वनक्षेत्रांत पार्टी करताना आढळल्यास वन विभागाकडून कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे वन क्षेत्रातली पार्टीचे बेत करून कायद्याच्या कचाट्यात अडकू नका. ३१ डिसेंबर रोजी अनियमितता घडणा-या घटनांवर गस्त घालून बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश उपवनसंक्षक अलिबाग राहुल पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

३१ डिसेंबर २०२३ वर्ष अखेरीस व नविन वर्षाचे स्वागतासाठी वनक्षेत्रातील गडकिल्ले, समुद्रकिनारी कांदळवनक्षेत्र किंवा त्याचे लगत, वनक्षेत्रातील शासकीय निवासस्थाने व प्रत्यक्ष वनक्षेत्रांत पार्टीचे पर्यटकांकडुन नियोजन करण्यांत येते. अशा ठिकाणी अमली पदार्थाचे सेवन करणे, धुम्रपान, नशापाणी करणे व त्यामुळे वनक्षेत्रांत वणवे लागणे, रात्री उशिरा पर्यंत मोठया प्रमाणावर गाणी वाजवणे, इत्यादीमुळे वन्यप्राण्यास त्रास होणे अशा घटना घडत असतात. अशा घटना टाळणे साठी वन विभाग हा सज्ज झाला आहे. 

अलिबागचे उपवनसंक्षक राहुल पाटील, यांनी त्यांच्या अधिनस्त असलेले सर्व वनपरीक्षेत्र अधिकारी, कर्मचारी यांना वन क्षेत्रात ३१ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास अनियमितता घडणा-या घटनांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच वनकर्मचा-यांना वनक्षेत्रातील गस्त वाढविण्याच्या सुचना देऊन, अनियमितता आढळल्यास तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

३१ डिसेंबर २०२३ रोजी वर्ष अखेरीस व नविन वर्षाचे स्वागत करण्यामध्ये अतिउत्साही पर्यटकांकडुन कोणतिही अनियमितता घटना घडू नये, या करीता राहुल पाटील, उपवनसंरक्षक अलिबाग यांनी सर्व क्षेत्रीय वन अधिकारी, कर्मचारी यांचे समवेत वनक्षेत्रांत कोणतीही अनियमीतता घडणार नाही, याची दक्षता घेऊन त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवणेसाठी हिरिरीने पुढाकार घेतला आहे.