शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दिवेआगर-भरडखोल रस्त्यावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 01:25 IST

पर्यटकांचा प्रवास खडतर : समुद्रकिनारी मार्गाकडे लोकप्रतिनिधी, बांधकाम खात्याचे दुर्लक्ष

गणेश प्रभाळे 

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यालगत असणारा दिवेआगर-भरडखोल मार्ग पूर्णत: खड्डेमय बनला आहे. या रस्त्याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याने येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडल्याने पर्यटक संताप व्यक्त करत आहेत.

श्रीवर्धन म्हटले की, विस्तीर्ण समुद्रकिनारा डोळ्यासमोर येतो. समुद्रकिनाºयालगत असणारे दिवेआगर-शेखाडी या मार्गावरील १७ किलोमीटरचा प्रवास पर्यटकांना सुखद आनंद देणारा ठरत आहे. त्यामुळे या रस्त्याला बारमाही पर्यटकांच्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. मात्र, या मार्गावरील दिवेआगर ते भरडखोल या अंतरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने ‘नको असले पर्यटन’ असे म्हणत पर्यटक संताप व्यक्त करतात. या सात किलोमीटरच्या अंतरावर पावलोपावली खड्डे दिसतात. कोकणातील पर्यटन तालुका म्हणून श्रीवर्धन तालुक्याची ओळख आहे. राज्यभरातून अनेक भाविक व पर्यटक हरिहरेश्वर, दिवेआगर, श्रीवर्धन, जंजिरा किल्ल्यावर तसेच या मार्गावर असणाºया भरडखोल व जीवना येथील प्रसिद्ध मासेमारी बंदर येथे नेहमीच ये-जा करतात.बोर्लीपंचतन या मुख्य शहरातून श्रीवर्धन तालुक्यात शेखाडी या मार्गाने पोहोचता येते. श्रीवर्धन येथे जाण्यासाठी हा पर्यायी मार्ग असून, प्रस्तावित महामार्ग आहे. या मार्गावर एसटीच्या पाच ते सहा गाड्या रोज धावतात. दिवेआगर, भरडखोल, शेखाडी, कोंडवील व आरावी बीच या रस्त्यालगत आहे. त्यामुळे या रस्त्याला वाहनांची वर्दळ नेहमीच असते. मात्र, या मार्गाकडे वेळोवेळी दुर्लक्ष होत आले आहे. या मार्गावर दिवेआगर गावापासून छोटे-मोठे खड्डे पडल्याने रस्तेच खड्ड्यात गेल्याचे चित्र निर्माण झाले असून, या रस्त्यावरून वाहनचालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पर्यटक व भाविकांना कित्येक वर्षे या रस्त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांची त्वरित दुरुस्ती वा डागडुजी करावी, अशी मागणी वाहनचालक, प्रवासी तसेच येथील ग्रामस्थांकडून होत आहे.दिवेआगर-भरडखोल रस्त्याची दुरुस्ती किंवा नूतनीकरण करण्यात यावे, असे मागणी पत्र भरडखोल ग्रामपंचायततर्फे लोकप्रतिनिधींना देण्यात आले आहे. मात्र, अद्याप दुरुस्ती झाली नाही.- दिनेश चोगले, सरपंच, भरडखोल.दिवेआगर-भरडखोल रस्त्याचे डांबरीकरण कामाला मंजुरी मिळाली आहे. हा रस्ता नव्याने डांबरीकरण होणार असून, या आठवड्यात रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल.- श्रीकांत गनगणे, उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीवर्धन.

टॅग्स :Raigadरायगडroad safetyरस्ते सुरक्षा