शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

पिकअप-ट्रेलरची धडक; वाहनांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 23:10 IST

माणगाव : तालुक्यातील गारळ गावच्या हद्दीत हॉटेल रायगड दर्शन जवळ पिकअप व ट्रेलरची समोरा समोर धडक झाली. या अपघातामध्ये दोन्ही ...

माणगाव : तालुक्यातील गारळ गावच्या हद्दीत हॉटेल रायगड दर्शन जवळ पिकअप व ट्रेलरची समोरा समोर धडक झाली. या अपघातामध्ये दोन्ही चालकांना किरकोळ दुखापत झाली, तर दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.

फिर्यादी अहमद उल्ला (२१, रा. कळंबोली) यांच्या ताब्यातील ट्रेलर क्र. एम एच ४६/बी बी/ ०२८३ हे न्हावाशेवा ते महाड असे मुंबई-गोवा माहमार्गावरून घेऊन जात असताना २३ मे रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास मौजे गारळ येथे हॉटेल रायगड दर्शन जवळ आले, त्या वेळी महाडकडून मुंबई बाजूकडे जाणारी पिकअप क्र. एम एच ०८/डब्लू/ ३२९५ ने चुकीच्या दिशेला येऊन ट्रेलरला समोरासमोर ठोकर मारली, यानंतर ट्रेलर डाव्या बाजूला घेत असताना स्लिप होऊन पलटी झाला. या अपघातामध्ये दोन्ही चालकांना किरकोळ दुखापती होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. याबाबत माणगाव पोलीस ठाण्यामध्ये मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. नि. रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवालदार धुपकर करीत आहेत.

आंबेत घाटात गाडीने घेतला पेटआंबेत घाटात गाडीतून धूर येऊन, गाडीने अचानकपणे पेट घेतल्याने यामध्ये संपूर्ण गाडी जळून खाक झाली. मात्र, यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. नितिश लक्ष्मण धुमक (३०, रा. पोयनार, ता. खेड, जि. रत्नागिरी) हे एम.एच.०२, एव्ही-२५९० ही कार घेऊन अलिबाग ते पोयनार असे जात असताना, गाडी आंबेत घाटात आल्यानंतर गाडीतून अचानक धूर येऊ लागला. धुमक यांनी गाडी थांबवून, बॉनेट उघडण्यासाठी गेले असता, गाडीने पेट घेतला. या आगीमध्ये ही गाडी संपूर्णपणे जळून खाक झाली. मात्र, यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. गोरेगाव पोलीसठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.