शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

करंजा मासळी बाजार सुरू करण्याची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 00:23 IST

मत्स्यव्यवसाय विभागाचे लेखी पत्र; उत्तन, वसई, वर्सोवा, मुंबईतून मासेविक्री करण्यासाठी येणाऱ्या वाहनांना बंदी

उरण : उरण परिसरातील मच्छीमारांना करंजा टर्मिनल अ‍ॅण्ड लॉजिस्टिक बंदराच्या बाजूच्या खाडीत मासळी उतरवून विक्री करण्याची लेखी परवानगी काही अटींवर मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त महेश देवरे यांनी दिली आहे. महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या शिष्टमंडळाच्या मध्यस्थीतुन उरणातील विविध मच्छीमार संस्थेचे पदाधिकारी आणि स्थानिक मच्छीमार यांच्याबरोबर बुधवारी झालेल्या बैठकीत चर्चेनंतर स्थानिक मच्छीमारांमध्ये सकारात्मक तोडगा निघाला.उरण परिसरातील मच्छीमारांना करंजा टर्मिनल अ‍ॅण्ड लॉजिस्टिक बंदराच्या बाजूच्या खाडीत मासळी उतरवून विक्री करण्याची लेखी परवानगी काही अटींवर गुरुवारी देण्यात आली. यामध्ये उत्तन, वसई, वर्सोवा, मुंबई परिसराबाहेरून मासळी विक्री करण्यासाठी येणाºया वाहनांना बंदी घातली आहे. करंजा, मोरा येथील मासेमारी नौकांवरील घाऊक व लिलाव पद्धतीने मासळी विक्रीसाठी सकाळी ५ ते ८ आणि दुपारी २ ते ८ वाजेपर्यंतची वेळ आहे. किरकोळ मासळी विक्रीसाठी गावपातळीवर निर्णय घेण्याची मुभा आहे.स्थानिक मच्छीमारांमध्येच उफाळून आलेल्या वादातून महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या शिष्टमंडळाने ५ आॅक्टोबर रोजी मच्छीमारांची भेट घेतली होती. दोन दिवसांपूर्वी मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त महेश देवरे यांच्या दालनात या वादावर तोडगा काढून बंद करण्यात आलेला मासळी बाजार पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी बैठक बोलावण्यात आली होती.या बैठकीत महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलोसे आणि सरचिटणीस किरण कोळी, कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, सरचिटणीस किरण कोळी, ठाणे-पालघर जिल्हा महिला संघटक ज्योती मेहेर, उल्हास वाटकरे, करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोळी, उपाध्यक्ष नरेश कोळी, मोरा मच्छीमार संस्थेचे पदाधिकारी आणि स्थानिक मच्छीमार सहभागी झाले होते. या निर्णयामुळे परिसरातील २,५०० मच्छीमारांचा प्रश्न मिटला आहे.महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीची मध्यस्थीउरण परिसरातील मच्छीमारांना करंजा टर्मिनल अ‍ॅण्ड लॉजिस्टिक बंदराच्या बाजूच्या खाडीत मासळी उतरवून विक्री करण्यासाठी करंजा मच्छीमार संस्थेने परवानगी मागितली होती.त्याची दखल घेत रायगडचे सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त एस.आर.भारती यांनी १०० मच्छीमार बोटींसाठी काही अटीशर्तीवर मासे विक्रीस तत्काळ परवानगीही दिली होती.मात्र, सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी दिलेली परवानगी बेकायदा असल्याचे सांगत उरणचे भाजपचे आमदार महेश बालदी यांच्या तक्रारीनंतर मासळी बाजार बंद करण्यात आला होता.मासळी बाजार अचानक बंद झाल्यामुळे सुमारे परिसरातील २,५०० मच्छीमारांवर उपासमारीचे संकट आले होते. मात्र, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या मध्यस्थीमुळे मच्छीमारांना दिलासा मिळाला आहे.