शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

नेरळ आरोग्य केंद्राला कायमस्वरूपी डॉक्टर हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 02:43 IST

भास्कर तरे यांची मागणी : रु ग्णांचे हाल होत असल्याने आरोग्यमंत्र्यांना दिले निवेदन

नेरळ : कर्जत तालुक्यातील नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने येथे येणाऱ्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. नेरळ परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला कायमस्वरूपी डॉक्टर मिळावा यासाठी उपोषण देखील केले. परंतु अद्याप नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी डॉक्टर मिळाला नाही, जिल्हा प्रशासन देखील याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. त्यामुळे कोदिवले येथील सामाजिक कार्यकर्ते भास्कर तरे यांनी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन या प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तास कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे.

नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील ३५ हून अधिक वाड्या व गावामधील रुग्ण उपचार घेण्यासाठी या आरोग्य केंद्रात येत असतात. तेथे कधी डॉक्टर तर कधी औषधे नसतात अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आठवडाभरापूर्वी नेरळ परिसरातील माणगाववाडी येथील पाच वर्षांच्या बालकाला विंचू चावला असता त्याला नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले होते. परंतु येथे त्यावेळी डॉक्टर आणि नर्स नसल्याने त्याला कर्जत येथील रुग्णालयात न्यावे लागले, अशी परिस्थिती या नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात आहे. सायंकाळी पाचनंतर शिवाई व्यतिरिक्त कोणीही या रुग्णालयात नसते. त्यामुळे रात्री येणाºया रुग्णांना कोणत्याही प्रकारची सेवा मिळत नाही. यासाठी लवकरात लवकर नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राला कायमस्वरूपी डॉक्टर मिळावा यासाठी निवेदन देण्यात आले आहे.पावसाळा जवळ आल्याने सर्पदंश, विंचूदंश, तसेच अनेक लसीकरण व आजारांसाठी लस किंवा औषधे असणे आवश्यक आहे. तसेच प्रसूतीसाठी आणि शवविच्छेदनासाठी एमबीबीएस डॉक्टरची आवश्यकता आहे, याची ही कमतरता या रुग्णालयात असल्याने बाहेरून डॉक्टर मागवावे लागतात.अशी परिस्थिती या रुग्णालयाची झाली आहे आणि त्यामुळे आलेल्या रुग्णांना उपचार न घेता खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागत आहे. त्यामुळे भास्कर तरे यांनी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन कर्जत तालुक्यातील नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी २४ तास कायमस्वरूपी डॉक्टर मिळावा, अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे. 

टॅग्स :Raigadरायगडpanvelपनवेल