शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पेरीफेरी रस्त्यावर ‘अवजड’ पार्र्किं ग

By admin | Updated: February 8, 2016 02:44 IST

कळंबोली स्टील मार्केटमध्ये तयार करण्यात आलेल्या पेरीफेरी रोडवर मोठ्या प्रमाणात अवजड वाहने उभी करण्यात येत आहेत.

कळंबोली : कळंबोली स्टील मार्केटमध्ये तयार करण्यात आलेल्या पेरीफेरी रोडवर मोठ्या प्रमाणात अवजड वाहने उभी करण्यात येत आहेत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून रोडला पार्किंगचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यासंदर्भात वाहतूक पोलीस, सिडको व आरटीओ यांच्याकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.कळंबोली येथील ३०२ हेक्टर जमिनीवर लोह-पोलाद मार्केटकरिता १२५, २५०,४५०, ९०० चौ.मी. अशा वेगवेगळ्या आकाराचे १९६० भूखंड पाडण्यात आले. १९८० मध्ये सिडकोने भाडे करार करून लीज तत्त्वावर हे भूखंड व्यापाऱ्यांना दिले. मात्र ठरल्याप्रमाणे सुविधा देण्यात आल्या नाहीत. स्टील मार्केट आवारात मुख्य रस्त्यांची निर्मिती, देखभाल व इतर सुविधा देण्याची जबाबदारी सिडकोची होती. मात्र बाजार समितीकडे बोट दाखवून सिडको सातत्याने जबाबदारी झटकत होती. व्यापाऱ्यांनी सिडकोकडे वारंवार पाठपुरावा करून पेरीफेरी रोडचे काँक्रिटीकरणाचे काम मंजूर करून घेतले. त्यानुसार या मार्केटच्या पेरीफेरी रोडचे काम पूर्ण केले आले. एकूण ६ कि.मी. लांबीचे हे रोडचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. मुख्य रस्ता असल्याने वाहने याच रस्त्याहून मार्केटमध्ये ये-जा करतात. दररोज हजारो ट्रक, ट्रेलर मालाची चढ उतार करण्याकरिता येथे येतात. मात्र अवजड वाहनांसाठी पार्र्किं गची सुविधा नसल्याने ही वाहने रस्त्यावरच उभी करण्यात येत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहनांचे पार्किंग होत असल्याने केवळ एकच लेन वाहतुकीसाठी खुली असते. परिणामी रोडपाली सिग्नल ते बिमा संकुल दरम्यान वाहनांना आत बाहेर जाण्याकरिता तासन्तास अडकून पडावे लागतात. दररोज याविषयावर वाहतूकदार, वाहनचालकांमध्ये तंटे वाद होतात. आरटीओ कार्यालय सुध्दा याच रोडच्या बाजूला आहे. तरी सुध्दा कोणताही बदल किंवा सुधारणा होत नाही. या संदर्भात कळंबोली वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी गोरख पाटील यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिक्रि या मिळाली नाही.