शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

टँकर चालकांची देयके प्रलंबित

By admin | Updated: April 12, 2016 00:58 IST

शासनाच्या ‘आले मना तिथे कोणाचे चालेना’ याचा प्रत्ययच पेण पंचायत समितीच्या प्रशासकीय यंत्रणेत सुरु आहे. गतवर्षीचे खाजगी १० टँकर चालकांची तब्बल ४२ लाखांची देयके आजपर्यंत पेण

पेण : शासनाच्या ‘आले मना तिथे कोणाचे चालेना’ याचा प्रत्ययच पेण पंचायत समितीच्या प्रशासकीय यंत्रणेत सुरु आहे. गतवर्षीचे खाजगी १० टँकर चालकांची तब्बल ४२ लाखांची देयके आजपर्यंत पेण पंचायत समितीने दिले नाहीत. टँकरवर जीपीएस यंत्रणा लावून देखील त्यांची आॅनलाइन माहिती न भरल्याने १० पैकी ६ खाजगी टँकर मालकांना पेमेंट मिळाले नाहीत. यामुळे पेणच्या खारेपाटासह इतर विभागातील प्रस्ताव मंजूर झालेल्या ९ गावे ४१ वाड्या व ६ वाड्याचे अशा एकूण ५६ गाव- वाड्यांमध्ये पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. तर टँकर चालकांनी पेमेंट अदा केल्याशिवाय टँकर न देण्याचे धोरण स्वीकारल्याने परिस्थिती कशी हाताळावी हा सत्ताधाऱ्यांना प्रश्न पडला आहे.टंचाईग्रस्त गावे, वाड्यांचा प्रस्ताव द्या, टँकर मिळेल असे शासनाचे धोरण आहे. याचे आदेश सर्व अधिकार तहसीलदारांना राज्य शासनाने दिले आहेत. पेणच्या तहसीलदार वंदना मकू यांनी ६ टँकर अधिग्रहणाचे पत्र गटविकास अधिकारी पंचायत समिती पेण यांना दिले. मात्र मार्चअखेर होवूनसुध्दा गतवर्षीची खाजगी १० टँकर चालकांची ४२ लाखांची देयके व शासकीय २ टँकरची १५ लाख व इतर खर्च अशी एकूण ५७ लाखांची देयके जीपीएस यंत्रणेच्या शासकीय अध्यादेशामुळे अडली आहेत. जनता पाण्यावाचून तडफडत असताना पाणीपुरवठा करणे ही शासनाची जबाबदारी आहे. गतवर्षी ज्या टँकरवर जीपीएस यंत्रणा लावली होती त्याची आॅनलाइन माहिती भरणे, पेण पंचायत समिती प्रशासन यंत्रणेचीही जबाबदारी होती. तशीच ती खाजगी टँकर मालकांची होती. मात्र ती जबाबदारी का सांभाळली गेली नाही हे वास्तविक कोडे न सुटण्यासारखे आहे. मात्र यामुळे पाण्या वाचून नागरिकांचे हाल होत आहेत.शासन निर्णय २०१४-१५ मार्चनुसार टॅकर चालकांना जीपीएस यंत्रणा बंधनकारक आहे. जीपीएस यंत्रणेशिवाय केलेले पेमेंट ग्राह्य धरले जाणार नाहीत. शासनाच्या या निर्णयानुसार आम्हाला प्रशासन चालवावे लागते. मंत्रालयीन आदेश येईपर्यंत त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल.- श्वेता पालवे, गटविकास अधिकारी, पेण