शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

पेण बलात्कार, हत्या प्रकरण: उज्वल निकम यांचा युक्तिवाद पूर्ण; खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात

By राजेश भोस्तेकर | Updated: November 30, 2023 13:16 IST

४ डिसेंबरला आरोपी पक्षातर्फे युक्तिवाद

अलिबाग : पेण शहरातील मळेघर आदिवासी वडिवरील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याची घटना 29 डिसेंबर 2020 साली घडली होती. याबाबत अलिबाग जिल्हा न्यायालयात तीन वर्षापासून खटला सुरू आहे. या खटला अंतिम टप्प्यात आला आहे. गुरुवारी २९ नोव्हेंबर रोजी विशेष सरकारी वकील ऍड उज्वल निकम यांचा खटल्यातील युक्तिवाद पूर्ण झाला आहे. ऍड उज्वल निकम यांनी या खटल्यात २६ साक्षीदार यांची साक्ष नोंदवली आहे. ४ डिसेंबर रोजी आरोपी वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालय निकालाची अंतिम सुनावणी तारीख देतील. असे ऍड उज्वल निकम यांनी माहिती दिली आहे. 

पेण शहरातील मळेघर आदिवासी वाडीवरील तीन वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.  जिल्हा पोलिसांनी या घटनेचा तपास करून आरोपी आदेश पाटील याला अटक केली. आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून अलिबाग येथे एका गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. पॅरोलवर तो घरी आला असता त्याने हे कृत्य केले. पेण पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी राजकीय तसेच सामाजिक संघटनांनी मागणी केली होती. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ऍड उज्वल निकम याची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड भूषण साळवी हे सहाय्यक म्हणून काम पाहत आहेत.

जिल्हा मुख्य न्यायाधीश अजय राजदेकर याच्या न्यायलायात सुनावणी सुरू आहे. गुरुवारी २९ नोव्हेंबर रोजी खटल्याच्या सुनावणी साठी ऍड उज्वल निकम हे उपस्थित होते. ऍड उज्वल निकम यांनी या खटल्यातील अंतिम युक्तिवाद पूर्ण केला आहे. सुनावणी दरम्यान निकम यांनी २६ साक्षीदार यांची साक्ष नोंदवली आहे. ४ डिसेंबर रोजी आरोपी पक्षातर्फे वकील हे आपला युक्तिवाद पूर्ण करणार आहेत. खटल्यातील दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण होणार आहे. त्यामुळे खटल्याचा निकालाची तारीख न्यायालय मार्फत दिली जाणार आहे. त्यामुळे पेण बलात्कार व हत्याकांड प्रकरणाचा निकाल लवकरच न्यायलायतर्फे दिला जाणार आहे. ऍड भूषण साळवी यांनी निकम याच्यासोबत या प्रकरणात काम पाहिले. या निकालाकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळalibaugअलिबाग