शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये शेकाप-राष्ट्रवादी

By admin | Updated: February 24, 2017 05:55 IST

अत्यंत अतितटीच्या झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष

जयंत धुळप / अलिबागअत्यंत अतितटीच्या झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी यश मिळविता आले आहे. ५९ पैकी २३ शेकापने, तर १२ राष्ट्रवादी काँग्रेसने काबीज केल्या आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा २० वरुन १२ वर आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला एक शल्य लागून राहिले आहे. त्याच वेळी शेकापच्या मागील १९ जागांमध्ये वाढ होऊन त्यांना २३ जागी यश मिळाल्याने शेकाप मात्र सुखावला आहे. शिवसेनेच्या मागील १५ जागांमध्ये वाढ होवून १८ झाल्याने शिवसेनेमध्ये मात्र आनंदोत्सवच आहे.काँग्रेसच्या जागा ७ वरून ३ वर आल्याने, काही ठिकाणी सेनेबरोबर आघाडी करूनदेखील काँग्रेसला यश संपादन करता आले नाही. भाजपाची एक जागा रायगड जिल्हा परिषदेत होती, त्यात वाढ होऊन या वेळी तीन जागी भाजपाने यश संपादन केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे आणि शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यामध्ये मोठी नाराजीची लाट पसरली. आणि लाटेचे उधाणात रूपांतर होऊन जिल्ह्यातील दिग्गज नेते आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करून सेनेत प्रवेश केला. त्याचा फायदा सेनेला झाला. तोटा मात्र, राष्ट्रवादीला सोसावा लागला. काँग्रेसच्या मागील ७ जागांवरून काँग्रेस ३ जागांवर घसरल्याने, काही ठिकाणी सेनेबरोबर आघाडी करूनही काँग्रेसला अपयशच पत्करावे लागले आहे. भाजपाने मात्र प्रगती केली आहे. केवळ एक जागा होती, तेथे तिन जागी विजय संपादन केला आहे.केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या विकास कामांची पोच पावती मतदारांनी दिल्याचा दावा सेनेने केला आहे. युती तुटल्यावर शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेली चीडदेखील सेनेच्या यशाचे मोठे गमक मानले जात आहे.