शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागमध्ये शेकापचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 02:52 IST

राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे. त्यातील जाचक अटींमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत

अलिबाग : राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे. त्यातील जाचक अटींमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत, असे येथील आ. सुभाष पाटील यांनी सांगितले. विविध मागण्यांसाठी शेकापच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.सरकारने कर्जमाफीची घोषणा करून शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. दरवर्षी हमीभाव भात खरेदीला सरकारकडून डिसेंबरमध्ये मंजुरी मिळते. त्यामुळे दलालांकडून शेतकºयांची लूट होते. शेतकºयांना त्याचा योग्य मोबदला मिळत नाही. शेतकºयांच्या हितासाठी हमी भाव भात खरेदी १ आॅक्टोबर २०१७ पासून सुुरू करण्यात यावी, अशीही मागणी पाटील यांनी केली. अलिबाग, पेण, पनवेल, उरण या तालुक्यातील खारलॅण्ड विभागाने गेल्या पाच वर्षात बंधारे न बांधल्याने उधाणामुळे भातशेती नापीक झाली आहे. शेतांमध्ये कांदळवन तयार होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. खारलॅण्ड शेतीचे योग्य संवर्धन करण्यासाठी पर्यावरणाच्या जाचक अटी रद्द करून बंधारे बांधण्यासाठी निधीची तरतूद करावी. तसेच जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात कारखान्यातील सांडपाणी नद्यांमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे सावित्री, कुंडलिका, पाताळगंगा, नावडे या नद्या प्रदूषित होऊ लागल्या आहेत. मासेमारी व बागायती शेती व्यवसायावर गदा येण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखान्यांवर कारवाई करून मच्छी व्यवसाय व बागायती शेतीचे रक्षण करावे, एमएमआरडीएने घोषित केलेला औद्योगिक क्षेत्र आराखडा रद्द करण्यात यावा अशा अनेक मागण्यांसाठी शेकापच्यावतीने शेतकरी भवन येथून मोर्चा काढला.>जिल्हाधिकाºयांना निवेदनमोर्चात रायगड जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते, महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, शेकापचे जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील आदी उपस्थित होते.