शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे भरण्याचे काम रखडले

By admin | Updated: July 25, 2016 03:03 IST

नेरळ-कळंब रस्त्यावरील नेरळ ते अवसरेदरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने हा प्रवास धोकादायक बनला आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

नेरळ : नेरळ-कळंब रस्त्यावरील नेरळ ते अवसरेदरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने हा प्रवास धोकादायक बनला आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे लवकरात लवकर भरावेत, अशी मागणी प्रवासी व वाहनचालकांकडून केली जात होती. चार दिवसांपूर्वी या रस्त्यांवर खड्डे भरण्याचे काम बांधकाम खात्याने हाती घेतले होते. परंतु काम मध्येच रखडल्याने खड्ड्यांच्या प्रमाणात वाढ होऊन छोटे मोठे अपघातही वाढले आहेत.नेरळ - कळंब हा महत्त्वाचा जिल्हामार्ग असून, या रस्त्यावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. गेल्या अनेक महिन्यांपासून या मार्गावरील नेरळ ते अवसरेदरम्यान सुमारे सात किमीच्या अंतरावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. परंतु या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. नेरळ -कळंब हा सुमारे १२ किमीचा रस्ता असून, नेरळ ते अवसरे या भागाचे दोन वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु सध्या या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. याच रस्त्यावरील नेरळ साई मंदिर परिसरात चार दिवसांपूर्वी खड्डे भरले आणि उखडलेली अशी परिस्थिती आहे. तसेच धोमोते, दहीवली, बिरदोले, अवसरे अशा ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्याचा त्रास वाहनचालक व प्रवाशांना होत आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारे रस्त्यावर पडलेले खड्डे भरावे, अशी मागणी प्रवासी व वाहनचालकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)