शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भिसे खिंडीतील रस्त्यावरील संरक्षक कठडे तुटले

By admin | Updated: May 23, 2016 03:06 IST

रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील नागोठणे आणि रोहा या दोन शहरांना जोडणाऱ्या भिसे खिंडीतील रस्त्यावरील तुटलेले संरक्षक कठडे

मुरुड / बोर्ली-मांडला : रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील नागोठणे आणि रोहा या दोन शहरांना जोडणाऱ्या भिसे खिंडीतील रस्त्यावरील तुटलेले संरक्षक कठडे आणि धोकादायक वळणावरील वाढलेल्या झुडपामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवासी आणि वाहनचालकांकडून केली जात आहे.भिसे खिंडीतील रस्ता हा नेहमीच रहदारीचा असून हा रस्ता डोंगरामधून गेलेला आहे. वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यास किंवा इतर कारणांनी अपघात झाला तर मोठी भयानक परिस्थिती निर्माण होईल. या खिंडीतील अनेक ठिकाणी असलेले संरक्षक कठडे तुटलेल्या अवस्थेत असून खिंडीतील रस्ता हा नागमोडी वळणाचा आहे. याच्या बाजूला असणारी वृक्षांची वाढलेली झुडपे ही रस्त्यावर आली आहेत. वाढलेल्या झुडपांमुळे वाहनचालकांना वाहन चालविणे धोक्याचे बनले आहे. काही दिवसांनी पावसाचे आगमन होणार असून त्यावेळी ही झुडपे आणखी मोठ्या प्रमाणात वाढतील, तरी संबंधित विभागाने वाढलेली झुडपे तोडून टाकावी आणि तुटलेल्या संरक्षक कठड्याची दुरु स्ती करावी अशी मागणी जोर धरत आहे. रोहा हे तालुक्याचे ठिकाण तसेच नागोठणे हे राष्ट्रीय महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे नागोठणे विभागातील नागरिक हे शासकीय कामानिमित्त येत असतात. त्यांना रोहा येथे येण्यासाठी भिसे खिंडीतून यावे लागते किंवा नागोठणे -कोलाड नाका मार्गे रोहा असा वळसा घालून यावे लागत आहे. त्याचप्रमाणे नागोठणे येथे अभियांत्रिकी महाविद्यालय, रिलायन्ससारखे औद्योगिक प्रकल्प, अनेक उद्योग व्यवसाय असल्याने या भिसे खिंडीतून नागरिकांची कामधंद्यानिमित्त दिवस-रात्र ये-जा सुरू असते.या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. खिंडीतील धोकादायक नागमोडी वळणावरील तुटलेल्या अवस्थेतील संरक्षक कठडे आणि वृक्षांची वाढलेली झुडपे यामुळे ये- जा करणाऱ्या वाहन चालकांसहित नवीन वाहनचालक यांनाही समोरून येणारे वाहन बहुतांशी दिसत नाही. त्यामुळे अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संरक्षक कठडा तुटलेल्या ठिकाणी अपघात झाला तर वाहन हे थेट खोल दरीत कोसळण्याची भीती आहे. तरी संबंधित विभागाने याकडे वेळीच लक्ष देवून सहकार्य करण्याची मागणी प्रवाशांसहित वाहन चालकांकडून होत आहे. (वार्ताहर)