शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे होताहेत हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:14 IST

दीड कोटी रुपयांचे मानधन थकले; १२ पैकी नऊ डॉक्टर संपामध्ये सहभागी

अलिबाग : जिल्हा सरकारी रुग्णालयातील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील (एनआरएचएम) कंत्राटी डॉक्टरांचे सहा महिन्यांचे तब्बल दीड कोटी रुपयांचे मानधन थकले आहे. १२ पैकी नऊ डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले आहे. संपाचा आजचा सातवा दिवस असल्याने रुग्णालयातील रुग्णांचे मात्र हाल होत आहेत. यातील विशेष बाब म्हणजे कंत्राटी पद्धतीने कामावर रुजू होताना सरकारला एक बंधपत्र लिहून दिलेले आहे. त्यानुसार कंत्राटी डॉक्टरांना संप पुकारता येणार नाही, अशी तरतूद असतानाही डॉक्टरांनी संप पुढे रेटला आहे.डॉक्टरांना ठरलेले मानधन हे वेळेतच मिळायला पाहिजे. त्यामध्ये कोणाचे दुमत असण्याची गरज नाही. मात्र, रुग्णांच्या आरोग्याची हेळसांड करून संप सुरूच राहणार अलेल तर ते चुकीचे असल्याचे बोलले जाते. आधीच सरकारी रुग्णालयामध्ये ४४४ मंजूर पदांपैकी १७४ विविध संवर्गातील पद रिक्त आहेत. त्यातच आता एनआरएचएम अंतर्गत कंत्राटी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. त्यामुळे रुग्णालय व्यवस्थापनावरील ताण अधिक वाढला आहे. कमी डॉक्टरांच्या संख्येमुळे रुग्णांचेही हाल होत आहेत. जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यच उपचारासाठी येत असतात. त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांचे हाल होत असल्याने ते संतप्त झाले आहेत.कंत्राटी डॉक्टरांच्या नेमणुकी वेळी त्यांच्याकडून सरकारने बंधपत्र करून घेतले आहे. त्यामध्ये त्यांना संपावर जाता येणार नाही, अशी तरतूद असल्याने या कंत्राटी डॉक्टरांना सेवेतून कमी करून त्यांच्या ठिकाणी नवीन कंत्राटी डॉक्टरांची नेमणूक करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केली आहे. दरम्यान, जिल्हा सरकारी रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी परशुराम धामोडा आणि एनआरएचएमचे डॉ. नीलेश कोकरे यांच्याशी संपर्क साधला असता ते बैठकीत असल्याचे सांगण्यात आले.दीड कोटींचे मानधन कसे झालेशासन निर्णय २ मार्च २०१५ अन्वये शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्याबाबत धोरण निश्चित केले आहे.त्यानुसार विशेष वैद्यकीय अधिकाऱ्यांना ६५ हजार इतके मानधन निश्चित केले आहे. तर या मानधनाव्यतिरिक्त राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सरकारच्या काही नवीन योजनांनुसार कंत्राटी पद्धतीवर असलेल्या विशेष तज्ज्ञ डॉक्टरांना मासिक मानधनाव्यतिरिक्त प्रत्येक शस्त्रक्रियेसाठी प्रत्येकी चार हजार रु पये आणि लहान शस्त्रक्रियेसाठी दोन हजार रु पये मानधन देण्यात येते. त्यामुळे कंत्राटी पद्धतीवर असलेल्या स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञ या डॉक्टरांना दरमहा चार ते पाच लाख रु पये मानधन मिळते, असेही सावंत यांनी सांगितले.