शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शाळेची इमारत पालक करणार दुरुस्त

By admin | Updated: December 16, 2015 00:52 IST

तालुक्यातील नेरळ येथील कन्या शाळेची इमारत १०० वर्षे जुनी आहे. अनेक वर्षे दुरु स्ती न केल्यामुळे ही इमारत धोकादायक झाली आहे, त्यामुळे त्या ठिकाणी वर्ग भरविले जात नाहीत.

कर्जत : तालुक्यातील नेरळ येथील कन्या शाळेची इमारत १०० वर्षे जुनी आहे. अनेक वर्षे दुरु स्ती न केल्यामुळे ही इमारत धोकादायक झाली आहे, त्यामुळे त्या ठिकाणी वर्ग भरविले जात नाहीत. इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती सातत्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्याकडे पाठपुरावा करीत आहे. मात्र कोणीही लक्ष देत नसल्याने अखेर पालकांनी वर्गणी काढून इमारतीची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला असून, तो कर्जत पंचायत समितीला कळविला आहे. नेरळ येथील जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेची इमारत धोकादायक झाली आहे. यावर्षी शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यापासून या इमारतीच्या वर्गात कोणताही विद्यार्थी बसविला जात नाही, तसा निर्णय कर्जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने घेतला असून नेरळ कन्या शाळेमधील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग दोन शिफ्टमध्ये भरविले जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्र म पूर्ण होण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. पालकांनी याबाबत कर्जत पंचायत समिती आणि रायगड जिल्हा परिषदेकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. अनेक ठराव आणि निवेदने येथील शालेय व्यवस्थापन समितीने कर्जत पंचायत समितीकडे गेल्या दोन वर्षात सादर केली आहेत. तरी देखील १०० वर्षे जुन्या शाळेची दुरु स्ती करण्याचे किंवा नवीन वास्तू मंजूर करण्याचे काम प्रशासनाकडून होत नाही. गेली चार महिने सातत्याने कर्जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून कोणतीही कार्यवाही केली जात नाही. यामुळे शालेय व्यवस्थापन समिती आक्र मक झाली आहे.दोन शिफ्टमध्ये शाळा भरविली जात असल्याने विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान भरून निघणे कठीण असल्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासन करणार नसेल तर पालक वर्गणी गोळा करून जुन्या इमारतीच्या वर्गखोल्यांची दुरु स्ती करण्याचा निर्णय पालक सभेत घेतला आहे. सभेसाठी कविता शिंदे, सुभाष नाईक, सविता भाटकर, आरती राणे आदी पालक उपस्थित होते.