शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल पालिकेची स्थायी समिती सभा पुन्हा तहकूब; अर्थसंकल्पावरील सभा थेट एप्रिलमध्ये होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 23:38 IST

२२ मार्च रोजीच्या पनवेल महापालिकेच्या सभेतून मालमत्ता कर वाढीवरून महाविकास आघाडीचे सदस्य आक्रमक झाले होते

पनवेल:  पनवेल महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी बुधवारी आयोजित करण्यात आलेली सभा पुन्हा तहकूब करण्यात आली. आता अर्थसंकल्पावरील सभा थेट एप्रिलमध्ये पार पडणार असून, तत्पूर्वी मालमत्ता करासंदर्भात विशेष सभा भरविण्याची मागणी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी केली आहे. स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांनी याबाबत अनुकूलता दाखवत सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला.

२२ मार्च रोजीच्या पनवेल महापालिकेच्या सभेतून मालमत्ता कर वाढीवरून महाविकास आघाडीचे सदस्य आक्रमक झाले होते. या वेळी मालमत्ता करासंदर्भात विशेष सभा लावा, अन्यथा कोणत्याही सभेला उपस्थित राहणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली होती. २४ मार्च रोजी स्थायी समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी आक्रमक भूमिका घेत ही सभा तहकूब करायला लावली. आधी मालमत्ता कराबाबत निर्णय घ्या, नंतर सभा घ्या, असे प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले. भाजप नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी मालमत्ता करासंदर्भात आयोजित सभेत मालमत्ता करावरील चर्चा केल्यानंतर अर्थसंकल्पावर चर्चा करता येईल, असे स्पष्ट केले.

७७२ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीत सादर झालेला आहे. मात्र, होणारा विरोध लक्षात घेता सत्ताधाऱ्यांना याबाबत दोन पावले मागे यावे लागणार आहे. त्यामुळे मालमत्ता कराची अंदाजित रक्कम अर्थसंकल्पातून कमी होण्याची शक्यता आहे. २२ मार्च रोजीच्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान पत्रकारांना वार्तांकन करण्यास मनाई करण्यात आली होती. त्यांना सन्मानाने पुन्हा बोलावण्यात यावे, अशी मागणी पनवेल महापालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी केली आहे