शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतीसाठी पंचरंगी निवडणूक

By admin | Updated: December 22, 2015 00:34 IST

खालापूर नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी १० जानेवारीला निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खालापूरमधले निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून शेकाप

अमोल पाटील, खालापूरखालापूर नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी १० जानेवारीला निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खालापूरमधले निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे व भाजपा अशी पंचरंगी निवडणूक खालापूरमध्ये होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवार प्रचाराला लागले असून मतदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. ग्रामपंचायत बरखास्त झाल्यानंतर नगरपंचायतीची पहिल्यांदाच निवडणूक होत असून सर्वच राजकीय पक्षांनी सत्ता मिळविण्यासाठी कंबर कसली आहे.खालापूर नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी १० जानेवारीला मतदान होणार आहे. खालापूरमध्ये शिवसेना १७, शेकाप १५, राष्ट्रवादी १०, मनसे ८, भाजपा ४, काँग्रेस १ व ८ अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तालुक्याचे ठिकाण असलेल्या खालापूरमध्ये शेकाप व शिवसेनेची चांगली ताकद आहे. निवडणुकीच्या रिंगणात ६ प्रमुख राजकीय पक्ष असले तरी शेकाप आणि शिवसेनेतच खरी लढत अपेक्षित आहे. अन्य पक्षांचे उमेदवार व अपक्ष उमेदवारांवर शेकाप व शिवसेनेच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. खालापूरचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असून खालापूरच्या पहिल्या नगराध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान कुणाला मिळतो याची उत्सुकता आहे.निवडणूक जाहीर होऊन उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवार प्रचाराला लागले आहेत. पहिल्या टप्प्यात उमेदवारांचा भर मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर असून घरोघरी जावून उमेदवार मतदारांच्या भेटी घेत असल्याचे चित्र सध्या खालापूरमध्ये पहायला मिळत आहे. शेकाप व शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीनेही या निवडणुकीत चमत्कार करायची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे तालुका चिटणीस वैभव भोईर खालापूरचे रहिवासी असल्याने आपल्या पक्षाला अधिक जागा मिळाव्यात यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. मनसेने जिल्हाध्यक्ष मनीष खवळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीला सामोरे जायची तयारी सुरू केली आहे. खालापूरमध्ये भाजपाचे नगरसेवक निवडून यावेत यासाठी जिल्हा सरचिटणीस राजेंद्र येरूणकर व नेते एकनाथ पिंगळे लक्ष देत आहेत.