शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

७५ लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेले पळचिल आरोग्य केंद्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 02:47 IST

पोलादपूर : तालुक्यातील मौजे पळचिल येथे २००८-०९ साली ७५ लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेले पळचिल प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत गेले अनेक वर्षे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

प्रकाश कदम पोलादपूर : तालुक्यातील मौजे पळचिल येथे २००८-०९ साली ७५ लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेले पळचिल प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत गेले अनेक वर्षे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. लाखो रुपये खर्चूनही इमारतीच्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याने पावसाळ्यात संपूर्ण इमारत गळत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय इमारतीमध्ये साप, विंचवांचा वावर वाढल्याचे नागरिकसांगतात.पळचिल येथे प्राथमिक आरोग्य केंद्र २००४मध्ये मंजूर झाल्यापासून इमारतीचे काम सुरू झाले. मात्र, शासनाने लाखो रुपये खर्चातून बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन कधी आणि केव्हा होणार, अशी प्रतीक्षा पंचक्र ोशीतील जनतेला लागून राहिली आहे. या ठिकाणी असलेल्या आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी भेट देऊन आरोग्य व सेवेची माहिती देत असतात.राजिपचे माजी उपाध्यक्ष तथा जि.प. सदस्य चंद्रकांत कळंबे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, ते म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने संपूर्ण इमारत पावसाळ्यात गळत होती. यासाठी आपण जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमार्फत इमारतीच्या निकृष्ट कामाची चौकशी लावली असून, जिल्हा प्रशासनाकडून काम पूर्ण करून इमारत सुसज्ज करण्याचा मानस असल्याचे सांगितले.इमारतीच्या संरक्षण भिंतीसाठी २० लाखांचा निधी तसेच इमारतीला पत्राशेडसाठी २८ लाख ५६ हजारांचा निधी मंजूर करून काम सुरू केले असून येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेतून २५ लाख रुपये खर्चातून बंधाºयाचे बांधकाम करण्यात आले आहे.इमारतीला प्लास्टर, रंगरंगोटी, तुटलेले दरवाजे, खिडक्या, लादी यासाठी ही निधी उपलब्ध करून देणार आहे. विद्युतपुरवठा तसेच सौरऊर्जेचा वापर करून इमारतीची दिवाबत्तीची सोय करण्यात येणार आहे. येथील अपूर्ण असणाºया सर्व सोयी-सुविधा लवकरच पूर्ण करून या प्रा. आ. केंद्राच्या नवीन इमारतीचे लवकरच उद्घाटन करणार असल्याचा आत्मविश्वास माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी व्यक्त केला आहे.पळचिल प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ४४ गावांचा समावेश असून या अंतर्गत ५ उपकेंद्रे आहेत. या आरोग्य केंद्रात ११ पदे मंजूर असून ३ पदे रिक्त आहेत. यामध्ये १ वैद्यकीय अधिकारी रिक्त, १ मलेरिया सहायक, १ शिपाई ही पदे रिक्त तर कुष्ठरोग तज्ज्ञ डेपोरेसनसाठी पोलादपूर ता. आ. अधिकारी कार्यालय येथे कार्यरत आहे.>आरोग्य केंद्रात दररोज बाह्यरु ग्ण विभागामध्ये १५ ते २0 रु ग्ण उपचार घेत आहेत. केंद्रात विंचूदंश, सर्पदंश, श्वानदंशसाठी लागणारी औषधे आणि मागणीप्रमाणे औषधसाठा परिपूर्ण असल्याचे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मराठे यांनी सांगितले.