शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

भेळीव-सावे शाळेची दुरवस्था, प्रशासनाकडे केली दुरुस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 03:01 IST

पाली : रायगड जिल्हा परिषद शाळांच्या इमारतीची अनेक ठिकाणी दुुरवस्था झाली आहे.

विनोद भोईर पाली : रायगड जिल्हा परिषद शाळांच्या इमारतीची अनेक ठिकाणी दुुरवस्था झाली आहे. सुधागड तालुक्यातील माणगाव बु. ग्रामपंचायत हद्दीतील भेळीव सावे येथील जिल्हा परिषदेची शाळा मोडकळीस व धोकादायक झाली आहे. याबाबत अनेक वेळा तक्र ार व प्रस्ताव पाठवून जिल्हा परिषदेकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने दुर्घटना घडल्यास त्याला जिल्हा परिषद प्रशासनच जबाबदार असेल, असा इशारा पालकवर्गाने दिला आहे.भेळीव सावेतील शाळेची इमारत जीर्ण होऊन धोकादायक बदली आहे. मात्र रायगड जिल्हा परिषदेकडून या इमारतीची साधी दखलही घेण्यात आलेली नाही. शाळा व्यवस्थापन समिती व शाळेच्या वतीने १२ जानेवारी २०१६ रोजी दिलेल्या अर्जात शाळा इमारतीच्या छताच्या दुरु स्तीबाबत मुख्याध्यापकांनी अर्ज पाठवला आहे. याशिवाय पावसाळ्यातील इमारतीची गळती थांबवण्यासाठी ही दुरुस्ती त्वरित होणे आवश्यक असून सिलिंग कधीही कोसळेल अशा स्थितीत असल्याचे अर्जात नमूद केले आहे. शाळेच्या वतीने अनेकदा प्रस्ताव पाठवूनही रायगड जिल्हा परिषदेने इमारतीच्या दुरुस्तीबाबत गांभीर्य दाखवलेले नाही.शाळेत पहिली ते चौथीपर्यंत वर्ग भरविले जात असून विद्यार्थी पटसंख्या ३५ ते ४० इतकी आहे. जिल्हा प्रशासन विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ सुरू आहे.पावसाळ्यात संपूर्ण शाळा गळत होती. शाळेचे काँक्र ीट छत दबले आहे. एखादा दुर्घटना घडू नये म्हणून मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना भेळीव सावेच्या जुन्या शाळेत हलवण्यात आले होते. लाखो रु पये खर्च करून २००६ - ०७ मध्ये बांधण्यात आलेल्या शाळेच्या इमारतीची अवस्था बिकट धोकादायक झाली आहे. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेने वेळीच लक्ष देऊन भेळीव सावे शाळेच्या इमारतीची दुरु स्ती करावी, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.>विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळपहिली ते चौथीपर्यंत वर्ग भरविले जात असून विद्यार्थी पटसंख्या ३५ ते ४० इतकी आहे. जिल्हा प्रशासन विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळत असून दुर्घटना घडल्यास त्याला सर्वस्वी जिल्हा प्रशासनच जबाबदार असेल, असे पालकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Raigadरायगड