शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘रंग दे महाराष्ट्र’ अभियानांतर्गत रंगवल्या शाळांच्या भिंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:48 IST

रायगड जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्यात येत आहे. मात्र, सामाजिक परिवर्तन घडवून प्रगती साधायची असेल

अलिबाग : रायगड जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्यात येत आहे. मात्र, सामाजिक परिवर्तन घडवून प्रगती साधायची असेल, तर गावात एकोपा असणे आवश्यक आहे. गाव एक झाले तर काहीही साध्य करता येऊ शकते. सामाजिक एकोपा हीच खरी परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे, असा विश्वास रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शनिवारी माणगाव तालुक्यातील मुठवली गावातील ग्रामस्थांमध्ये जागविला आहे. या वेळी ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक उपस्थित होते.ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत जिल्ह्यातील निवडक गावातील कामांची पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा या पथकाने केली. सकाळी मुठवली ग्रामस्थांशी सर्व अधिकाºयांनी संवाद साधला. या वेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, प्रांताधिकारी ए. आर. देगावकर, तहसीलदार ऊर्मिला पाटील, गटविकास अधिकारी खेडकर, उपविभागीय कृषी अधिकारी येवले तसेच स्वदेस फाउंडेशचे तुषार इनामदार, ग्राम सामाजिक परिवर्तक लहू दोलताडे यांच्यासह ग्रामस्थ महिला, पुरु ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी व मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रह्मण्यम यांनी गावात विविध उद्योग व्यवसाय करणाºया कुटुंबांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली. या वेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना सूर्यवंशी म्हणाले की, ‘गाव करी ते राव न करी’ अशी एक म्हण आहे. त्याप्रमाणेच गाव एकत्र आल्यास, हवा तो विकास शक्य आहे. त्यासाठी शासनाची यंत्रणा सहयोग करेल. गावच्या शाळेचा विकास करा. त्यासाठी ग्रामस्थांनी योगदान द्या. हे योगदान आपल्या मुलांच्या विकासासाठी असून भविष्याची मोठी गुंतवणूक ठरेल. गावकºयांनी मिळून गावात नियमित स्वच्छता अभियान राबवावे, जेणेकरून स्वच्छतेची सवय मुलांच्या अंगी बाणावेल.ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम यांनी गावकºयांनी ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान हे गावकरी आणि शासन यांनी एकत्र येऊन तयार केलेले विकासाचे नवे मॉडेल ठरावे व त्याची सुरु वात रायगड जिल्ह्यात व्हावी, असे चांगले काम करावे, असे आवाहन केले.जिल्हाधिकारी बनले चित्रकारग्रामस्थांशी संवाद साधल्यानंतर उपस्थितांनी गावातील जि.प. शाळेच्या रंगकामात सहभाग दिला. या वेळी शाळेच्या भिंती रंगवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सेवाभावी कार्यकर्त व जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्सचे विद्यार्थी गावात आले होते. त्यांच्या मदतीने शाळेचे रंगकाम सुरु होते. ‘रंग दे महाराष्ट्र’या अभियानांतर्गत मुठवली येथील शाळेच्या भिंती शनिवारी रंगवण्यात आल्या. हे रंगकाम एरव्हीच्या रंगकामापेक्षा वेगळे होते. शालेय विद्यार्थ्यांना अधिक आकलन व्हावे, यासाठी भिंतींवर शैक्षणिकचित्रे काढण्यात आली. अभियानात स्वत: जिल्हाधिकारी सूर्यवंशी आणि ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम हे ही सहभागी झाले होते. दुपारनंतर या पथकाने सुधागड तालुक्यातील महागाव व नवघर या गावांतील कामांची पाहणी करून ग्रामस्थांशी संवादही साधला.