शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

पोषण, कुपोषण निर्मूलन मोहिमेला येणार गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 23:30 IST

कर्जत तालुक्यात आदिवासी विकास विभागाच्या वतीने प्रयत्न; दिशा कें द्राचा पुढाकार

कर्जत : तालुक्यात आदिवासी विकास विभागाच्या वतीने चालू असलेल्या अ‍ॅक्शन फॉर न्यूट्रिशन प्रकल्पामार्फत दिशा केंद्र या संस्थेच्या पुढाकाराने राबवल्या जाणाऱ्या कुपोषण निर्मूलन मोहिमेस गती येणार आहे. तालुक्यातील प्रशिक्षित आशा वर्क र या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. तालुक्यातील चाळीस गावांमध्ये या मोहिमेअंतर्गत कुपोषित मुले, पालक यांचे पोषण व आरोग्य सेवेबद्दल जनजागृती केली जाणार आहे, या जनजागृती मोहिमेचे नियोजन करण्यासाठी तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या रेखा दिसले यांच्या हस्ते करण्यात आले. येथील शबरी संस्थेच्या सभागृहात २६, २७ आणि २८ या तीन दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरात कुपोषित मुलांचे पोषण, कुपोषित मुलांना आरोग्य सेवा देणे, गरोदर व स्तनदा मातांना चौरस आहार देणे, कुपोषणाच्या श्रेणी निश्चित करून तीव्र कुपोषित मुलांना संदर्भसेवा देणे या बाबींविषयी माहिती देण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्या अरुणा हरपुडे, गटविकास अधिकारी बालाजी पुरी, सोयी संस्था पुणेचे विनोद शेंडे, पंचायत समिती विस्तार अधिकारी गायकवाड आदी उपस्थित होते. या प्रशिक्षणात चाळीस गावांतील अशा वर्कर सहभागी झाल्या होत्या. कॅन प्रकल्पाचे तालुका समन्वयक अशोक जंगले, रवी भोई आदी उपस्थित होते.काय आहे कॅन प्रकल्प?कम्युनिटी अ‍ॅक्शन फॉर न्यूट्रिशन प्रकल्प आदिवासी उपाययोजनेतील चाळीस गावांतील अंगणवाडीत ० ते ६ वयोगटांतील मुलांची आरोग्य तपासणी करणे, वजन-उंची घेणे, वजन-उंचीनुसार तीव्र कुपोषित, मध्यम कुपोषित, तीव्र कमी वजनाचे, मध्यम कमी वजन व वाढीतील घसरण या पाच श्रेण्या निश्चित करण्यात येतात. या पाच श्रेणींतील मुलांचा पाठपुरावा करणे, मुलांना आरोग्य व पोषण सेवा उपलब्ध करून देणे, कुपोषण समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, हा हेतू या मोहिमेचा आहे. अशा प्रकारे कॅ न प्रकल्प राबवला जातो.