शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन प्रणाली, अग्निसुरक्षेचे ऑडिट, रुग्ण सुरक्षेला प्राधान्य द्या - पालकमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 01:01 IST

जिल्ह्यात काेराेनाचा कहर काही केल्या थांबायचे नाव घ्यायला तयार नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आराेग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करायगड : नाशिकला झालेल्या ऑक्सिजनच्या गळतीपाठाेपाठ विरारमधील रुग्णालयात घडलेल्या आगीच्या गंभीर दुर्घटनेमुळे सर्वांचाच थरकाप उडाला आहे. रायगड जिल्ह्यातील ऑक्सिजन आणि आगीच्या व्यवस्थापनाचे तातडीने ऑडिट करण्याचे आदेश रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. नाशिक आणि विरारसारखी दुर्घटना आपल्या जिल्ह्यात हाेऊ नये यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.जिल्ह्यात काेराेनाचा कहर काही केल्या थांबायचे नाव घ्यायला तयार नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आराेग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचे चित्र आहे. बहुतांश रुग्णालये खचाखच भरून गेली आहेत. रुग्णांचा आकडा वाढत असताना मृतांच्या आकड्यानेही आता उसळी घेतली आहे. रुग्णांवर उपचार करण्याचे शिवधनुष्य आराेग्य विभाग जेमतेम पेलत आहे. त्यामध्ये प्रशासकीय यंत्रणेची दमछाक हाेताना दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये रुग्णालयांमध्ये एखादी दुर्घटना घडल्यास त्याची फार माेठी किंमत माेजावी लागू शकते. याची जाणीव सरकार आणि प्रशासनाला आहे. त्याचाच भाग म्हणून अलिबाग, पनवेल, माणगाव आणि महाड येथील रुग्णालयातील ऑक्सिजन प्रणालीचे ऑडिट करण्यात येत असल्याचे पालकमंत्री तटकरे यांनी 'लाेकमत'ला सांगितले. त्याचप्रमाणे विरारसारखी घटना आपल्या जिल्ह्यात घडू नये. यासाठी जिल्ह्यातील नागरी आणि ग्रामीण भागातील जिल्हा रुग्णालय, कोविड रुग्णालये, कोविड केअर सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणांपासून तातडीने अग्निशमन यंत्रणा तैनात ठेवण्याच्या सूचना आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. त्याचप्रमाणे पाेलीस यंत्रणेनेही याबाबत सहकार्याची भूमिका घ्यावी असे स्पष्ट केले.रायगडच्या जिल्हाधिकारी, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त हे या निर्देशाचे पालन करतील; तसेच सर्व संबंधितांना आवश्यक ते आदेश जारी करतील, असेही तटकरे यांनी सांगितले. सध्याच्या परिस्थितीत शक्य तितकी सावधगिरी बाळगून नागरिकांच्या आणि रुग्णांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असेही त्यांनी म्हटले आहे.

विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या अति दक्षता विभागात लागलेल्या आगीत 13 रुग्णांचा हाेरपळून मृत्यू झाला. त्यानंतर प्रशासन सर्तक झाले आहे. जिल्हा सरकारी रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आराेग्य केंद्र येथील फायर आॅडीट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,    - निधी चाैधरी, जिल्हाधिकारी  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या