शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘आमचा गाव - आमचा विकास’ रॅली

By admin | Updated: July 30, 2016 04:28 IST

शासनाच्या १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत आमचा गाव-आमचा विकास या योजनेची माहिती देण्याकरिता देवळे ग्रामपंचायतीच्या वतीने एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

पोलादपूर : शासनाच्या १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत आमचा गाव-आमचा विकास या योजनेची माहिती देण्याकरिता देवळे ग्रामपंचायतीच्या वतीने एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.शासनाची आमचा गाव - आमचा विकास ही योजना राज्यभरात सुरू झाली आहे. या कार्यक्र मातून ग्रामीण भागातील समस्यांचा अभ्यास करून विकास आराखडा बनविण्यासाठी लोकसहभाग वाढावा, जनजागृती व्हावी यासाठी ग्रामपंचायत अंतर्गत लहुलसे, दाभिळ, करंजे, हलदुले, केवनाळे आणि देवळे येथे रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरु वात गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करु न करण्यात आली. या कार्यक्र मांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा बनविणे, महिला सभा घेऊन विकासात्मक योजना राबवणे, प्रत्येक गावाचा विकास आराखडा तयार करणे आदींचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्र माच्या निमित्ताने ग्रामपंचायतीच्यावतीने मशाल फेरी, सीमा फेरी आणि जनजागृती रॅली काढण्यात आली. आमचा गाव - आमचा विकास कार्यक्र मानुसार शनिवारी (३० जुलै) ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचे आयोजन केले आहे.