शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 06:09 IST

रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीतील १३ तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता रायगड पोलीस दल आणि लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-२०१७’ चे आयोजन करण्यात आले आहे.

विशेष प्रतिनिधी अलिबाग : रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीतील १३ तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता रायगड पोलीस दल आणि लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-२०१७’ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेस शासन नियुक्त रायगड जिल्हा अग्रणी बँक आॅफ इंडिया आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचा सहयोग लाभला आहे. या स्पर्धेत सर्व पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी करुन घेवून ही स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी केले आहे.रायगड जिल्हा पोलिसांच्या गुन्हे परिषदेत, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या हस्ते रायगड पोलीस दल आणि लोकमत आयोजित ‘सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-२०१७’ च्या प्रवेश अर्जाचे प्रकाशन करण्यात आले त्यावेळी पारसकर बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, पोलीस उप अधीक्षक(गृह) राजेंद्र दंडाळे, जिल्ह्यातील सर्व उप विभागीयपोलीस अधिकारी, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारीतसेच लोकमतचे कर्मचारी उपस्थित होते.स्पर्धेचे प्रवेश अर्ज शनिवारपासून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये उपलब्ध राहाणार आहेत. ही स्पर्धा रायगड पोलीस कार्यक्षेत्रातील १३ तालुक्यांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता मर्यादित आहे. स्पर्धेच्या सहभागाकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही.सार्वजनिक गणेशोत्सवाच्या देखाव्यात राष्ट्रीय एकात्मता, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन व संरक्षण, स्वच्छता आणि ध्वनीप्रदूषण नियंत्रणविषयक जनजागृतीपर देखाव्यांना स्पर्धेकरिता विचारातघेतले जाणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सामाजिककार्य याचाही समावेश निवडीच्या निकषामध्ये आहे.निवडीचे निकषस्पर्धेत सहभागी होणाºया गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धा सहयोगींचा माहितीविषयक बॅनर प्रदर्शित करणे बंधनकारक राहणार आहे. परीक्षक मंडळ व आयोजकांचा निर्णय अंतिम व मंडळांना बंधनकारक राहाणार आहे.गरज भासल्यास स्पर्धेचे नियम व अटी बदलण्याचे अधिकार आयोजकांनी राखून ठेवले आहेत. स्पर्धेच्या परीक्षणाची पद्धती आणि पारितोषिकांची घोषणा लवकरच ‘लोकमत’ मधून करण्यात येणार आहे.स्पर्धेचे प्रवेश अर्ज शनिवारपासून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये उपलब्ध राहणार आहेत. ही स्पर्धा रायगड पोलीस कार्यक्षेत्रातील १३ तालुक्यांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता मर्यादित आहे.