शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोनारी ग्रामपंचायतीच्या जमीनी ग्रामस्थांना विक्री केल्याप्रकरणी मंडळाच्या सदस्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2024 19:22 IST

अनधिकृत बांधकामे ३० दिवसात निष्काषीत करण्याच्या प्रांत अधिकाऱ्यांच्या आदेशाने खळबळ 

- मधुकर ठाकूर

उरण : उच्च न्यायालयाच्या सुचनेनंतर पनवेल प्रांत  अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत सोनारी येथील ग्रामपंचायतीच्या शेकडो एकर जमीनी ग्राम सुधारणा कार्यकारी मंडळाला कोणताही अधिकार नसतानाही शेकडो ग्रामस्थांना जमिनींची विक्री  केल्याचे निदर्शनास आले आहे.दोषी असलेल्या या मंडळाच्या सदस्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश देतानाच अनधिकृत ठरविण्यात आलेले घरांचे बांधकाम एक महिन्यात निष्काषीत करण्याचे आणि तत्कालीन ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. पनवेल प्रांत अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सोनारी ग्रामपंचायतींमधीलच नव्हे तर करळ , सावरखार, जसखार हद्दीत अशाच प्रकारे उभारण्यात आलेली सुमारे दिड हजार अनधिकृत ठरण्याची शक्यता आहे.अशा घरांवर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.यामुळे रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.

जेएनपीएने २२ वर्षांपूर्वी सार्वजनिक उपयोगासाठी सुमारे ३१ हेक्टर क्षेत्र प्रकल्पबाधित सोनारी,करळ , सावरखार, जसखार आदी चार गावांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द केले आहे .त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सदर जमिनी चारही ग्रामपंचायतींच्या नावे केल्या आहेत.मात्र  ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जमिनी स्थानिक ग्रामस्थ मंडळाने फरोक्त खताने शेकडो गावकऱ्यांना विकल्या आहेत.या जमिनीवर नागरिकांनी घरे बांधली आहेत. अशाच बांधलेल्या घरांवरुन सोनारी येथील रहिवासी उर्मिला आशिर्वाद म्हात्रे आणि रामचंद्र पोशाख कडू यांच्यात वाद निर्माण झाला होता. हा वाद उच्च न्यायालयात पोहचला होता.न्यायालयाने या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या.त्यानंतर या प्रकरणी सुनावणी घेऊन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पनवेल प्रांत अधिकाऱ्यांना दिले होते.

सुनावणीनंतर याप्रकरणी ग्राम सुधारणा कार्यकारी मंडळाला कोणताही अधिकार नसतानाही ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जमीनी फरोक्त खताने ग्रामस्थांना विकण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सोनारी येथील ग्राम सुधारणा कार्यकारी मंडळाच्या सदस्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करून अनधिकृत बांधकाम एक महिन्यात निष्काषीत करण्याचे आणि तत्कालीन ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. करळ ,सावरखार, जसखार या ग्रामपंचायतीच्या हद्दीतही अशाच प्रकारे सुमारे दिड हजार घरे उभारण्यात आली आहेत. सर्वाधिक घरे जसखार ग्रामपंचायतींमध्ये बांधण्यात आली आहेत. अशी सुमारे दिड हजार घरे ही अनधिकृत ठरण्याची शक्यता आहे.त्यामुळे अशा अनाधिकृत घरांवर गंडांतर येण्याची भीती निर्माण झाली आहे.यामुळे मात्र रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Raigadरायगड