शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

माथेरान मुख्याधिकारी घोलप यांच्या चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:09 IST

२६ एप्रिलला होणार चौकशी : गैरहजर राहिल्यास कारवाई

मुकुंद रांजणे ।माथेरान : माथेरानमध्ये जून २०१६मध्ये सागर घोलप यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आजवर सभागृहातील सदस्यांनी केव्हाच कुठल्याही कामात सकारात्मकता दर्शवली नसून, त्यांच्या नेहमीच्याच आडमुठे धोरणांमुळे माथेरान हे अनेक विकासकामांपासून वंचित राहिले असल्याने आम्ही सत्तेत विराजमान झाल्यामुळे जनतेच्या प्रश्नांना वेळप्रसंगी न्याय देऊ शकत नाही. त्यासाठी मुख्याधिकारी घोलप यांच्या मनमानी कारभारास वैतागून विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी मागील वर्षापासून एकूण तीन ते चार वेळा जिल्हाधिकारी रायगड यांना लेखी निवेदने प्रत्यक्षपणे सादर केलेली आहेत. दि. १ मार्च २०१८ रोजी जिल्हाधिकारी रायगड यांना पुन्हा सदर बाबतीत तक्र ारी अर्ज सादर करून अशा अकार्यक्षम मुख्याधिकारी यांच्या कामाची चौकशी करावी, असे लेखी निवेदन दिल्याने अप्पर जिल्हाधिकारी यांनी घोलप यांना दि. २६ एप्रिल रोजी सदर तारखेच्या वेळी नगरपालिका कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत.नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी निवेदनात म्हटल्याप्रमाणे मुख्याधिकारी घोलप यांनी त्यांच्या स्वत:च्या मनमानी कारभारामुळेच मागील २० महिन्यांत नागरिकांच्या सूख-सोयीसाठी कुठल्याही प्रकारच्या निविदा काढलेल्या नाहीत. प्रत्येक विकासाची बाब माथेरान सनियंत्रण समितीवर ढकलून हात झटकत आहेत. सन २०१७-१८च्या अर्थसंकल्पीय सभेमध्ये महत्त्वाची कागदपत्रे मागितली, तेव्हा उडवाउडवीची उत्तरे देत सन्माननीय सदस्यांना अर्वाच्च भाषा वापरणे. अनेकदा स्वहिताचा प्रश्न सभागृहात उपस्थित करून मर्जीतील ठेकेदारांना कामे देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणे. मुख्याधिकारी नगरपालिकेच्या निवासस्थानात न राहता, दुपारी २ नंतरच कार्यालयात येऊन रात्री उशिरापर्यंत कर्मचारीवर्गाकडून कामे करून त्यांची कुचंबणा करणे, नगरसेवकांच्या पत्राला केराची टोपली दाखवणे, आपत्कालीन वेळेस हजर न राहणे, ठेकेदारांची बिले अदा न करणे, त्यामुळे कुणीही ठेकेदार निविदेतील कामे घेण्यास धजावत नाही. तसेच प्रशासकीय कामे मार्गी लावण्यासाठी सांगितल्यावर ही कामे माझी नाहीत, असे निर्भीडपणे सांगत आहेत. सफाई कामगारांना नाहक वेठीस धरून त्यांचे पगारही वेळेत न करणे, त्यामुळे अनेकदा सफाई कामगार संपाचे हत्यार उपसतात, तेव्हाच मुख्याधिकारी जागे होत आहेत. अशा अपप्रवृतीमुळे ते नगरपालिकेचा कारभार चालविण्यास असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे अशा निष्क्रीय, कामचुकार अधिकाऱ्यांच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे, या आशयाचे लेखी निवेदन नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी दिल्यानुसार घोलप यांना सखोल चौकशीसाठी दि. २६ एप्रिल रोजी हजर राहून आपले म्हणणे मांडावे आणि जर हजर न राहिल्यास कारवाई करण्यात येईल, असा आदेश अप्पर जिल्हाधिकारी रायगड यांनी मुख्याधिकारी घोलप यांना पत्र देऊन दिलेला आहे. त्यामुळे घोलप हे खरोखरच चौकशीसाठी हजर राहतील की नाही? कारण मध्यंतरी खुद्द जिल्हाधिकारी यांनी घोलप यांना जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहणेबाबत सूचित करूनदेखील ही व्यक्ती हजर राहिली नव्हती, त्यांनी जिल्हाधिकारी यांचा आदेश धुडकावून लावला होता. त्यामुळे निदान या वेळेस तरी घोलप हजर राहणार का? याबाबत नागरिकांमध्ये तर्क-वितर्क सुरू आहेत.

टॅग्स :Raigadरायगड