शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यावरील स्लॅबला विरोध

By admin | Updated: December 11, 2015 01:20 IST

शहरालगत असणाऱ्या आणि वरसे ग्रामपंचायत हद्दीतील सातमुशी नाल्यावर स्लॅब टाकण्याचे काम सुरू आहे. या नाल्यावर स्लॅब टाकल्यास भुवनेश्वर विभागातील शांतीनगर

रोहा : शहरालगत असणाऱ्या आणि वरसे ग्रामपंचायत हद्दीतील सातमुशी नाल्यावर स्लॅब टाकण्याचे काम सुरू आहे. या नाल्यावर स्लॅब टाकल्यास भुवनेश्वर विभागातील शांतीनगर, एकता नगर, आदर्शनगर, हरिओम, प्रियदर्शनी, मिलन या इमारतींमधील रहिवाशांना पाण्याचा सामना करावा लागणार आहे. हा नाला कायमस्वरूपी उघडा ठेवण्यात यावा तसेच नाल्याची रूंदी कायम ठेवण्यात यावी यासाठी येथील रहिवाशांनी जिल्हाधिकारी रायगड, तहसीलदार रोहा, गटविकास अधिकारी तसेच सरपंच आणि ग्रामसेवक वरसे यांना निवेदन दिले आहे.वरसे ग्रामपंचायत हद्दीतील शांतीनगर, एकता नगर, आदर्शनगर, हरिओम, प्रियदर्शनी, मिलन या इमारती पावसाळ्यात तुंबून राहणाऱ्या पाण्यामुळे बाधित होत असतात, याचा फटका येथील रहिवाशांना बसत आहे. सनसिटी बिल्डरने त्यांच्या स्वत:च्या फायद्यासाठी सातमुशी नाल्यावर स्लॅब टाकण्यास सुरु वात केली आहे. या नाल्यावर स्लॅब टाकल्यास आम्हा नागरिकांच्या वसाहती पावसाळ्यात पूर्णपणे बुडण्याची भीती आहे. हा नाला कायमस्वरूपी उघडा ठेवण्यात यावा तसेच मूळ नाल्याची रूंदी कायम ठेवण्यात यावी. सातमुशी नाल्यावर स्लॅब टाकण्यास स्थानिक रहिवाशांचा विरोध असल्याचे तेथील रहिवासी नंदकुमार राक्षे, एस. पी. सोनावणे, भास्कर कदम यांनी सांगितले आहे.सातमुशी नाल्याच्या प्रश्नांबाबत संबंधितांकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप देखील नागरिकांनी केला आहे. या विभागातील पाण्याचा पावसाळ्यात पूर्णत: निचरा होत नसल्याचे ३-४ वर्षांपूर्वी बें्रडा कॉम्प्लेक्स येथून पर्यायी नाला बांधण्यात आला आहे. परंतु हा नाला अतिशय उथळ असून या नाल्याचा प्रवाह देखील सातमुशी नाल्याकडे वळविल्याने पावसाचे पाणी तसेच बारमाही सांडपाणी सातमुशी नाल्यातूनच जात असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. हा नाला अरूंद करण्यास सनसिटी बिल्डरला परवानगी का देण्यात आली, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. (वार्ताहर)