शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नव्या मालमत्ता कर प्रणालीवरून विरोधक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 01:59 IST

पीपीई किट घालून सभागृहात प्रवेश; सत्ताधाऱ्यांकडून आवाज दाबला जात असल्याचा आरोप

पनवेल : पनवेल महानगरपालिकेची महासभा सोमवारी आयोजित करण्यात आली होती. सभा सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातल्याने सभेचे कामकाज सुमारे तासभर बंद होते. कोविडमुळे सध्याच्या घडीला ऑनलाइन सभेचे आयोजन करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. मात्र ऑनलाइन सभेत सत्ताधारी विरोधकांना बोलू देत नसल्याने विरोधकांनी पीपीई किट घालून सभागृहात प्रवेश करीत सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन करण्यात आले. पालिका क्षेत्रात सध्याच्या घडीला मालमत्ता कराच्या नवीन प्रणालीनुसार नागरिकांना वाढीव मालमत्ता कराच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत. सुमारे ५ वर्षांचा एकत्रित कर नागरिकांना भरावा लागणार आहे. हा कर जादा असल्याने पालिका क्षेत्रात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम पसरला आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी मालमत्ता करावर चर्चा करीत नाहीत. ऑनलाइन महासभेत विरोधकांना म्यूट करून त्यांचा आवाज दाबला जात असल्याने शेकाप, महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी पीपीई किट घालून सभागृहात प्रवेश करीत सत्ताधारी भाजपचे निषेधाचे बॅनर सभागृहात फडकवले.  

या वेळी पीठासीन अधिकारी महापौर डॉ. कविता चैतमोल यांच्यात व विरोधकांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहावयास मिळाले. विरोधी पक्षाचे नगरसेवक सभागृहातून बाहेर गेल्याशिवाय ऑनलाइन महासभेचे कामकाज चालू करणार नसल्याचे महापौर चैतमोल यांनी सांगितले. मात्र तरीदेखील विरोधक सुमारे तासभर सभागृहातच सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी देत होते. तासाभरानंतर ऑनलाइन सभेचे कामकाज सुरू झाले. या सभेत सिडको नोडमधील मैदाने व उद्यानांच्या विकासासाठी २२ कोटींच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. याव्यतिरिक्त कळंबोलीमधील ६ ई मधील भूखंड क्रमांक २ वरील उद्यान आयजीपीएल कंपनीच्या सीईआर फंडातून विकसित करण्यास मंजुरी देण्यात आली. खारघर गावातदेखील ११ कोटींच्या विकासकामांना या वेळी मंजुरी देण्यात आली.ऑनलाइन सभेत यापूर्वी पत्रकारांना वार्तांकन करण्यास पालिकेच्या वतीने परवानगी देण्यात आली होती. मात्र विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे पत्रकारांनादेखील सभेचे वार्तांकन करण्यास मज्जाव करण्यात आला.

ऑनलाइन सभेत आमच्या अनेक नगरसेवकांना म्युट करून त्यांना बोलू दिले जात नाही. वाढीव मालमत्ता कराच्या बाबतीत सत्ताधारी चर्चेस तयार नाहीत. विरोधकांचा आवाज दाबण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आम्ही कोविडचे नियम पाळून पीपीई किट घालून सत्ताधाऱ्यांच्या निषेधासाठी हे आंदोलन केले. - प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्षनेता, पनवेल महानगरपालिका

सत्ताधाऱ्यांविरोधात काहीही बोलल्यास कारवाईची भीती दाखविली जाते. आम्ही कारवाईला घाबरत नसून पालिका क्षेत्रातील नागरिकांचे हित आमच्यासाठी सर्वस्वी आहे. - सतीश पाटील, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या