शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन माहिती अधिकार पाच रुपयाने महागला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:12 IST

महाराष्ट्राच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने २६ जानेवारी २०१५ रोजी ‘आपले सरकार’ हे नवे वेबपोर्टल सुरू केले होते. या पोर्टलवर सुरुवातीला दहा रुपये आॅनलाइन भरून माहिती अधिकार अर्ज भरता येत होता

अलिबाग : महाराष्ट्राच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने २६ जानेवारी २०१५ रोजी ‘आपले सरकार’ हे नवे वेबपोर्टल सुरू केले होते. या पोर्टलवर सुरुवातीला दहा रुपये आॅनलाइन भरून माहिती अधिकार अर्ज भरता येत होता, पण आता मात्र माहिती अधिकार अर्ज भरताना पोर्टल फी पाच रुपये असे एकूण १५ रुपये आकारले जात आहेत.माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी गेले काही दिवस महाराष्ट्र सरकारच्या आपले सरकारवर माहिती अधिकार अर्ज भरले असता त्यांना प्रत्येक अर्जासाठी पंधरा रुपये भरावे लागले. माहिती अधिकार दाखल केल्यावर सरकारकडून माहिती अधिकार अर्जाबाबत जी पोहच येते त्यावर मात्र दहा रुपयेच आकारले जात असल्याचा उल्लेख केला जातो. त्यामुळे सरकारकडून जी पाच रुपये पोर्टल फी म्हणून आकारली जाते. ते धरून पंधरा रुपयांची पावती अर्जदारास मिळणे आवश्यक आहे कारण अर्जदाराच्या बँक खात्यातून एकूण पंधरा रुपये वजा होत असल्याचा संदेश अर्जदाराला येतो. हे पंधरा रुपये सरकारला अदा केल्याचा उल्लेखही या संदेशामध्ये असतो अशी माहिती सावंत यांनी दिली.आपले सरकार या वेबपोर्टलमुळे माहितीचा अधिकार आॅनलाइन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले होते. या कायद्याचा वापर करताना कोर्ट फी स्टॅम्प वापरावे लागत होते. परंतु आॅनलाइन माहिती अधिकार झाल्यानंतर बँक अकाऊंटमधून आवश्यक असलेले शुल्क इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्र ेडिट कार्ड यांचा वापर करून अदा करण्याची सोय झाली होती. ही गोष्ट चांगली असली तरी माहिती अधिकार फीमध्ये पोर्टल फी म्हणून पाच रुपये वाढविल्याने सरकारी कार्यालयात जावून दहा रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प लावणे स्वस्त ठरणार असल्याने सरकारने ही पाच रुपयांची पोर्टल फी रद्द करावी अशी मागणी सावंत यांनी केली आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या आॅनलाइन माहिती अधिकार वेबसाईटवर अशा प्रकारे कोणतीही अतिरिक्त पोर्टल फी आकारली जात नसल्याचे संजय सावंत यांनी सांगितले.केंद्र सरकार कोणतीही अतिरिक्त फी आकारणी करीत नसताना महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याने आॅनलाइन माहिती अधिकार अर्जासाठी पोर्टल फी म्हणून पाच रुपये अधिक घेणे माहिती अधिकार कार्यकर्त्यांना खटकत असल्याचे मतही सावंत यांनी व्यक्त केले आहे.