शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘एक आठवडा महिलांसाठी’ उपक्रम

By admin | Updated: August 9, 2016 02:25 IST

शासनाच्या महसूल विभागाच्यावतीने महिला सक्षमीकरण मोहिमेंतर्गत ‘एक आठवडा महिलांसाठी’ हा उपक्र म राबविण्यात येत आहे.

नागोठणे : शासनाच्या महसूल विभागाच्यावतीने महिला सक्षमीकरण मोहिमेंतर्गत ‘एक आठवडा महिलांसाठी’ हा उपक्र म राबविण्यात येत आहे. १ ते ७ आॅगस्ट दरम्यान हा उपक्र म प्रत्येक गावात राबविण्यात आला. त्या अनुषंगाने ही मोहीम शनिवारी विभागातील आमडोशी येथे पार पडली. आमडोशी येथील हनुमान मंदिरात त्या निमित्ताने महिलांची विशेष सभा घेण्यात येऊन त्यात उपक्र माची भूमिका स्पष्ट करण्यात आली. या कार्यक्र माला तहसीलदार दीपक गायकवाड, नायब तहसीलदार बांदिवडेकर, रोहे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शेगडे, पर्यवेक्षिका लखिमले, मंडळ अधिकारी मनोज मोरे, कृषी अधिकारी मढवी, सरपंच एकनाथ ठाकूर आदींसह अंगणवाडी सेविका, शेकडो महिला उपस्थित होत्या. या मोहिमेंतर्गत सातबारा ८ अ उताऱ्यावरील महिलांच्या सबलीकरणासाठी महसूल विभागाकडून व्यापक जनसंपर्क मोहीम, महसूल विभागाशी निगडित प्रश्नांसोबत कृषी, सहकार, बालकल्याण योजना, गावपातळीवर महिलांचे मेळावे, मोहिमेद्वारे महिला खातेदारांसाठी माहिती आदी विषयांबाबतची महत्वपूर्ण माहिती दीपक गायकवाड यांनी महिलांसमोर स्पष्ट केली. यावेळी मान्यवरांचे हस्ते महिलांना सातबारा उताऱ्यांचे वाटप करण्यात आले. गावात बचत गट असून त्याद्वारे महिलांनी सक्षम होण्यासाठी त्याचा वापर करीत बचत गटांद्वारे विविध लघुउद्योग चालू करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले. (वार्ताहर)